विशेष प्रतिनिधी
लंडन : कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे ब्रिटनमध्ये रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पंतप्रधान कार्यालयाने लसीकरणाशी संबंधित संयुक्त समितीकडून दोन डोसमधील अंतर कमी करण्याबाबत सल्ला मागितला आहे. ब्रिटनची एकूण लोकसंख्या ६.८२ कोटी असून त्यापैकी ६८ टक्के लोकांना पहिला डोस तर ५१ टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यात आली आहे. Delta patiants increased in Briton
अजूनही देशातील रुग्णालयांत ५३ लाख रुग्ण वेटिंगवर असून उन्हाळ्यापर्यंत ती संख्या १.३ कोटी होवू शकते. खाटा अपुऱ्या पडत असल्याने कोरोनाशिवाय अन्य आजाराने पीडित असलेले रुग्ण हे उपचारासाठी दवाखान्यात जाऊ शकत नाहीत.
ब्रिटनमध्ये गेल्या चोवीस तासात नव्याने ३२ हजार रुग्णांची भर पडलेली असताना ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. लसीकरणाबाबत पंतप्रधान कार्यालयाने समितीकडून अहवाल मागितला आहे. दोन डोसमधील अंतर आठ आठवड्यांऐवजी चार आठवड्याचे असावे, असे सरकारमधील अनेक मंत्र्यांचे मत आहे. लसीकरण हेच संसर्गाला रोखण्यासाठी प्रभावी माध्यम असल्याने सरकारकडून लसीकरणाबाबत धोरण बदलण्याची तयारी केली जात आहे. ब्रिटनचे लसीकरण अभियानाचे मंत्री नदीम जहावी यांनी दोन डोसमधील अंतर कमी करण्याबाबत तज्ञांचा सल्ला मानला जाईल, असे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App