Money Laundering Case : आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदीयांच्या ‘ईडी’कोठडीत पाच दिवसांची वाढ

Manish Sisodia

दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने GNCTD च्या उत्पादन शुल्क धोरणाची रचना आणि अंमलबजावणीमध्ये कथित अनियमितता संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात  दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या ईडी कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ केली आहे.  मनीष सिसोदिया यांना दिल्ली मद्य धोरण प्रकरणी ईडीने आज न्यायालयात हजर केले होते. जेथे त्यांच्या कोठडीत आणखी सात दिवस वाढ करण्याची मागणी केली होती. Delhis Rouse Avenue Court extends Manish Sisodia ED remand by five more days


मनीष सिसोदियांना बंगला सोडण्याची नोटीस; सत्येंद्र जैन – सिसोदियांमध्ये केजरीवालांकडून भेदभाव


ईडीने मनीष सिसोदिया यांची ७ दिवसांची कोठडी मागितली होती आणि म्हटले होते की, सिसोदिया यांच्या कोठडीदरम्यान अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, सिसोदिया यांच्या वकिलाने न्यायालयाला विचारले की, एजन्सीला अबकारी धोरण प्रकरणात अधिक कोठडी हवी आहे, ईडी सीबीआयची प्रॉक्सी आहे का? तर कोठडी वाढवली नाही, तर सर्व मेहनत व्यर्थ जाईल असा युक्तिवाद ईडी कडून करण्यात आला.


Z+ सुरक्षा, बुलेटप्रूफ वाहनाचा लाभ घेत PMO अधिकारी असल्याचे सांगून जम्मू-काश्मीरचे दौरे करणाऱ्या ठगास अटक


ईडीने न्यायालयाला सांगितले की मनीष सिसोदिया यांच्या ईमेलमध्ये सापडलेल्या डेटाचे फॉरेन्सिक विश्लेषण केले जात आहे. सिसोदिया यांनी त्यांचा फोन डेटा नष्ट केल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे,  त्यांची पुन्हा एकदा चौकशी करण्याची गरज आहे,  त्यामुळे सिसोदिया यांच्या कोठडीत सात दिवसांची वाढ करण्याची विनंती केली आहे.

न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना त्यांच्या कुटुंबाच्या खर्चासाठी आणि त्यांच्या पत्नीच्या वैद्यकीय खर्चासाठी अनुक्रमे ४० हजार आणि ४५ हजार रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याची परवानगी त्यांना दिली. याचबरोबर मनीष सिसोदिया यांच्या पुढील कोठडीची मागणी करणार्‍या ईडीच्या याचिका आणि रिमांडला विरोध करणार्‍या त्यानंतरच्या याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर राऊस अव्हेन्यू न्यायालयाने मनीष सिसोदिया यांच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ केली आहे. १० मार्च रोजी न्यायालयाने सिसोदिया यांना १७ मार्च २०२३ पर्यंत ईडी कोठडी सुनावली होती.

Delhis Rouse Avenue Court extends Manish Sisodia ED remand by five more days

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात