Delhi results : Indi आघाडी आपापसांत लढली; आम आदमी पार्टी + काँग्रेसची नौका यमुनेत बुडली!!

Delhi results

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय पातळीवर Indi आघाडीत एकत्र असलेले दोन पक्ष काँग्रेस आणि आम आदमी पार्टी आपापसात लढले. त्यामुळे त्या दोघांच्या नौका यमुनेत बुडाल्या. दिल्लीतली आम आदमी पार्टीची सत्ता गेली आणि ती काँग्रेसलाही मिळाली नाही दोन्ही पक्ष वेगवेगळे लढल्याने दिल्लीत भाजपची सत्ता आली.



दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतली सकाळी 11.०० वाजता भाजप 41 पार्टी 29 जागांवर आघाडीवर होती. काँग्रेसला एकही जागा मिळू शकत नव्हती. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे नेते एकमेकांना अहंकारी म्हणून स्वतंत्रपणे लढले. त्याचा परिणाम दिल्लीच्या निवडणुकीत दिसला. यावरून प्रचंड राजकीय टोलेबाजी सुरू झाली.

आपल्या आपल्यातच लढा आणि मरा असा टोला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांना हाणला. संजय राऊत यांनी एवढ्या तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, पण काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र लढले असते, तर निकाल वेगळा लागला असता, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत तर खासदार प्रियांका गांधी यांनी निवडणूक निकाल आणि कल यांच्याकडे लक्षच दिले नव्हते.

Delhi results : Indi alliance fought among themselves; Aam Aadmi Party + Congress boat sinks in Yamuna!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात