विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने घातला 4000 मतांचा कोलदांडा, नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवालांचा पराभव झाला. नवी दिल्ली मतदार संघातल्या आकडेवारीने हे चित्र समोर आणले.
नवी दिल्ली मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे माजी खासदार संदीप दीक्षित यांच्यात लढत झाली. ही सगळ्यात हाय प्रोफाईल लढत ठरली. कारण प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचे चिरंजीव, तर संदीप दीक्षित हे माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव यांच्याशी अरविंद केजरीवाल या आम आदमी पार्टीच्या सर्वेसर्वांची लढत झाली.
या लढतीत प्रवेश वर्मा यांना 28 हजार 448 मते मिळाली तर अरविंद केजरीवाल यांना 24 हजार 583 मते मिळाली. संदीप दीक्षित यांना 4254 मते मिळाली. केजरीवाल यांचा 3865 मतांनी पराभव झाला. अर्थातच काँग्रेसची संदीप दीक्षित यांची 4254 मते निर्णायक ठरली. केजरीवाल यांच्याविरुद्ध संदीप दीक्षित उभे राहिले नसते तर ती मते कदाचित केजरीवाल यांना मिळाली असती आणि त्यांचा निसटता का होईना, पण विजय झाला असता, पण काँग्रेसने तिरंगी लढत करून कोलदांडा घातला आणि केजरीवालांचा पराभव केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App