वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मुंदका येथे आगची मोठी दुर्घटना घडली. या आगीत आतापर्यंत 27 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी जण आत अडकल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात 2 कारखाने मालकांना अटक केली असून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल केला आहे. Delhi Mundka Fire: 27 killed in Horpul; 2 factory owners arrested
पश्चिम दिल्ली परिसरातील काल एका इमारतीला संध्याकाळी भीषण आग लागली होती. या आगीप्रकरणी कारखाना मालकांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या आगीची चौकशीची करण्यात येणार आहे. दिल्लीतील मुंदका येथे लागलेल्या आगीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एफएसएलची टीम घटनास्थळी जाणार आहे. एफएसएल टीम आगीचे कारण शोधून काढेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना तातडीची दोन लाखाची मदत जाहीर केली आहे. जखमींवर सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एमसीडीच्या बुलडोझर कारवाईवर बोलावलेली सकाळी 11.00 ची आमदारांची बैठक रद्द केली आहे.
आदेश गुप्ता यांच्या घरावरील आजचे आंदोलनही आम आदमी पक्षाने रद्द केले. मुंडका आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.
Mundka blaze: NDRF team carries out search, rescue operations Read @ANI Story | https://t.co/xZpeTpNgD3#MundkaFire #Mundka #NDRF pic.twitter.com/9vN93Hc4QC — ANI Digital (@ani_digital) May 14, 2022
Mundka blaze: NDRF team carries out search, rescue operations
Read @ANI Story | https://t.co/xZpeTpNgD3#MundkaFire #Mundka #NDRF pic.twitter.com/9vN93Hc4QC
— ANI Digital (@ani_digital) May 14, 2022
इमारतीत अग्निसुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था नव्हती, अशी माहिती पुढे आली आहे. दिल्ली अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, इमारतीमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्था पुरेशी नव्हती. या इमारतीला अग्निशमन विभागाने एनओसीही दिलेली नाही. ही आग इतकी भीषण होती की यात अख्खी बिल्डिंगच आगीच्या विळख्यात सापडली आहे. आठ तासांहून अधिक वेळ ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न केले. दरम्यान इमारतीचे मालक हरीश गोयल आणि वरूण गोयल यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
– घटनाक्रम
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App