मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली दारू धोरण प्रकरणी तुरुंगात असलेले आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांना राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. जिथे न्यायालयाने त्यांना १७ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. Delhi Liquor Scam No relief for Manish Sisodia stay in jail till April 17
सीबीआयच्या वतीने सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, तपास सध्या गंभीर टप्प्यावर आहे. त्यामुळेच आम्ही सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची मागणी करत आहोत.
मनीष सिसोदिया यांची न्यायालयात हजेरी सुरू असताना कार्यकर्त्यांनी आप मुख्यालयात निदर्शने सुरू केली. पोलिसांनी कोर्ट आणि भाजप मुख्यालयासमोर सुरक्षेसाठी पोलिस बॅरिकेड्स लावले आहेत.
सीबीआय कोर्टानेही जामीन फेटाळला होता –
गेल्या महिन्यात दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मनीष सिसोदिया दिल्ली उच्च न्यायालयात जाणार असल्याचे तेव्हा सांगितले होते. मनीष सिसोदिया यांना सीबीआयने २६ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या नवीन दारू धोरणात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App