Juhi Chawla 5G Plea : सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री जुही चावलाने 5 जी तंत्रज्ञानाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी घेतली. अभिनेत्री जुही चावलाची याचिका फेटाळत न्यायालयाने 20 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. कायदेशीर प्रक्रियेचा याचिकाकर्त्याने दुरुपयोग केल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. Delhi HC dismisses Actress Juhi Chawla 5G Plea, imposes Fine of Rs 20 lakh
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री जुही चावलाने 5 जी तंत्रज्ञानाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी घेतली. अभिनेत्री जुही चावलाची याचिका फेटाळत न्यायालयाने 20 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. कायदेशीर प्रक्रियेचा याचिकाकर्त्याने दुरुपयोग केल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत.
हायकोर्टाने म्हटले की, केवळ प्रसिद्धीसाठी याचिका दाखल केल्याचे दिसून येत आहे. यामुळेच याविषयीची लिंक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. न्यायमूर्ती जीआर मिधा यांच्या खंडपीठाने आदेशात म्हटले की, हे आरोप त्रासदायक आहेत.
उच्च न्यायालयाची सुनावणी सुरू असतानाच जुही चावलाचे गाणे ‘घुंघट की आड से’ गाणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीला आणि बेकायदेशीरपणे सुनावणीत भाग घेतलेल्या सर्वांना न्यायालयाने अवमान नोटीस बजावण्यात आली आहे. कोर्टाच्या सुनावणीत अडथळा आणल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना अशा लोकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचवेळी न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्याने कोर्टाची संपूर्ण फीदेखील जमा केलेली नाही, जी दीड लाख रुपयांहून जास्त आहे.
बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने जुही चावला, सरकारला निवेदन न देता 5G वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञानाला आव्हान देण्यासाठी थेट कोर्टात आल्यावरून प्रश्न उपस्थित केले होते. तंत्रज्ञानांसंबंधित जुही चावलाच्या चिंतेबाबत सरकारला कोणतेही निवेदन न देता, जुही चावला यांनी देशात 5 जी वायरलेस नेटवर्क स्थापित करण्याच्या विरोधात थेट दावा दाखल करण्यासंदर्भात हायकोर्टाने सवाल केला.
Delhi HC dismisses Actress Juhi Chawla 5G Plea, imposes Fine of Rs 20 lakh
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App