वृत्तसंस्था
नवी दिल्ली : या देशात बर्गर, पिझ्झाची होम डिलीवरी होते. मग धान्यवाटप घरोघरी का नाही, होऊ शकत??, असा सवाल खडा करणाऱ्या अरविंद केजरीवालांना दिल्लीच्या भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.Delhi government’s one country one ration card scheme Burgers on top Kejriwal’s doubles at the center from pizza delivery; BJP’s response
दिल्लीत केजरीवाल सरकारने एक देश – एक रेशनकार्ड योजना लागूच केलेली नाही. त्यामुळे हक्काचे धान्य दिल्लीकरांना मिळत नसल्याचे मीनाक्षी लेखी केजरीवालांना सुनावलेय.
दिल्लीच्या जनतेला केंद्र सरकारने मोफत धान्य द्यावे, अशी मी त्यांना हात जोडून विनंती करतो, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आज सकाळीच वक्तव्य केले होते. त्याचवेळी त्यांनी या देशात जर बर्गर, पिझ्झाची होम डिलीवरी होते, तर धान्यवाटप का नाही होत?, असा टोला केंद्र सरकारला लगावला होता. त्या मुद्द्यावरूनच मीनाक्षी लेखी यांनी केजरीवालांना टार्गेट केले आहे.
केंद्र सरकार से खाद्य सुरक्षा अधिनियम के तहत आए अनाज को बिचौलियों को दिया जाएगा और ये सामान किसे बंटेगा, या नहीं बंटेगा किसी को पता नहीं है। केंद्र सरकार पर बोझ बढ़ता रहेगा और सामानों की कालाबाजारी होती रहेगी: मीनाक्षी लेखी, भाजपा https://t.co/u0xgMIL3BH — ANI_HindiNews (@AHindinews) June 6, 2021
केंद्र सरकार से खाद्य सुरक्षा अधिनियम के तहत आए अनाज को बिचौलियों को दिया जाएगा और ये सामान किसे बंटेगा, या नहीं बंटेगा किसी को पता नहीं है। केंद्र सरकार पर बोझ बढ़ता रहेगा और सामानों की कालाबाजारी होती रहेगी: मीनाक्षी लेखी, भाजपा https://t.co/u0xgMIL3BH
— ANI_HindiNews (@AHindinews) June 6, 2021
त्या म्हणाल्या, की दिल्लीत २००० रेशन दुकाने आहेत. तेथे एक देश – एक रेशनकार्ड ही योजनाच लागू नाही. त्यामुळे केंद्राकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून मिळणारे धान्य दलाल – मध्यस्थांना मिळते.
ते रेशन दुकानांपर्यंत पोहोचतेच असे नाही. पण आपली वितरण व्यवस्था ठीक करण्यापेक्षा केजरीवाल हे केंद्राला दोष देताहेत, अशी टीका मीनाक्षी लेखी यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App