वन नेशन वन रेशनकार्ड योजनेचा विस्तार आता ३२ राज्यांत

स्थलांतरीत मजुरांना स्वस्त धान्य दुकानातून रेशन मिळावे यासाठी मोदी सरकारने सुरू केलेल्या वन नेशन वन रेशनकार्ड योजनेचा विस्तार आता देशातील ३२ राज्यांत झाला आहे. आता देशातील कोणताही रेशनकार्डधारक कुठल्याही राज्यात आपल्या हक्काचे रेशन घेऊन शकणार असल्याने गोरगरीब स्थलांतरीत मजुरांना त्याचा लाभ मिळणार आहे. One Ration One Ration Card Scheme now extended to 32 states


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : स्थलांतरीत मजुरांना स्वस्त धान्य दुकानातून रेशन मिळावे यासाठी मोदी सरकारने सुरू केलेल्या वन रेशन वन रेशनकार्ड योजनेचा विस्तार आता देशातील ३२ राज्यांत झाला आहे. आता देशातील कोणताही रेशनकार्डधारक कुठल्याही राज्यात आपल्या हक्काचे रेशन घेऊन शकणार असल्याने गोरगरीब स्थलांतरीत मजुरांना त्याचा लाभ मिळणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेमुळे आता देशातील कोणताही रेशन कार्ड धारक कुठल्याही राज्यातून आपल्या रेशनचा लाभ घेऊ शकतो. या योजनेचा फायदा हा प्रामुख्याने स्थलांतरित मजूर आणि त्यांच्या कुटुंबाला होणार आहे. त्यांना देशाच्या कुठल्याही भागात रेशन धान्य दुकानातून धान्य घेणं शक्य होणार आहे. या योजनेचा फायदा देशातील ८ कोटी कुटुंबांना होणार आहे. त्याचबरोबर मोदी सरकारने मेरा रेशन अ‍ॅपही विकसित केले आहे. त्याच्या माध्यमातून रेशन दुकानातून धान्य घेणे आता अधिक सोपे होणार आहे. अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. रेशन दुकानात किती धान्य साठा आहे, दुकान उघडे आहे का आदी माहिती या अ‍ॅपवरून मिळणार आहे.

गोरगरीबांसाठी रेशन कार्डवरील धान्याचा आधार असला तरी या यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होता. धान्याचा काळाबाजार सुरू होता. हे रोखण्यासाठी रेशन व्यवस्थेचे डिजीटायझेनशन करण्याचा उपक्रम मोदी सरकारने सुरू केला आहे. त्याचा फायदा आत्तापर्यंत २३ कोटी कुटुंबांना झाला आहे.

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजनेच्या अंमलबजावणीवर आणि श्रम संहितां लागू करण्यावर भर देण्यात आला आहे. स्थलांतरित कामगारांची माहिती संकलित करून त्यांना योग्य ठरेल असे काम उपलब्ध व्हावे, यासाठी पोर्टल सुरू करण्याची घोषणा देखील अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली होती.

देशभरात लाभार्थी कोणत्याही ठिकाणी असो त्याला अन्न सुरक्षा कायदा आणि इतर कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून रेशन धान्य उपलब्ध करता यावं हा या योजनेमागचा उद्देश आहे. तसंच यामाध्यमातून बोगस रेशन कार्डधारकांना या व्यवस्थेतून बाजूला काढलं जाईल. रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यात येईल आणि लाभार्थ्यांना बायोमेट्रीक ओळख दिली जाईल.

One Ration One Ration Card Scheme now extended to 32 states

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*