वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथसिंग उद्या एक दिवसाच्या लडाख दौऱ्यावर आहेत. तेथील पायाभूत सुविधांची पाहणी करण्याबरोबरच ते प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला भेट देण्याची शक्यता आहे. यावेळी ते सीमेवरील परिस्थितीची पाहणी करण्याबरोबर जवानांबरोबर चर्चा करणार आहेत. Defense Minister Rajnath Singh on a visit to Ladakh; Will review the situation in the border areas
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील गोग्रा आणि हॉट स्प्रिंग परिसरातून चीन च्या सैन्याने अद्यापि पूर्णतः माघार घेतलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याचे महत्व वाढले आहे. गेल्या काही वर्षात चिनी सैन्याने परिसरात जमवाजमव करून तणाव वाढविला आहे.गे
ल्या आठवड्यात सीमेवरील तणावाला चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताला जबाबदार ठरविले होते. त्यामुळे दोन्ही देशात तणाव निवळत असल्याचा बाबीला छेद गेला होता. गेल्या वर्षी चीनने कुरापत काढल्याचा आरोप भारताने केलं आहे.
सीमावर्ती भागात चीनने प्रथम सैन्याची आणि लष्करी साहित्याची जमवाजमव करून अकारण तणाव निर्माण केल्याचा ठपका भारताने ठेवला आहे. दोन देशात राजनैतिक पातळीवर चर्चेच्या २२ तर लष्करी पातळीवर ११ चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. संपूर्ण पश्चिम भाग आणि सीमावर्ती भागातील सर्व सैन्य चीनने माघारी घ्यावे, अशी भूमिका भारताची आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App