वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या पोलिसावर गुन्हा सिद्ध झाला आहे. त्याला २३वर्ष आणि सहा महिने अशी कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. Led to the assassination of George Floyd Convicted policeman sentenced to 22 years
डेरेक चॉविन,असे पोलिसाचं नाव आहे. गेल्या वर्षी जॉर्ज फ्लॉयड यांची या पोलिसाने हत्या केली होती. निव्वळ संशयावरून डेरेकने जॉर्ज यांच्या मानेवर गुडघ्याचा दाब दिला होता. या दाबामुळे गुदमरून जॉर्ज यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी न्यायाधीश पीटर काहील याने मिनियापोलिस राज्याच्या कायद्यात नमूद असलेल्या १२ वर्षं आणि ६ महिन्यांहून अधिकची शिक्षा ठोठावली. या सुनावणीवेळी डेरेकवर आपल्या अधिकार आणि पदाचा गैरवापर करणे तसंच जॉर्जसोबत क्रूरता दाखवणे, असा ठपका ठेवला.
त्यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत प्रक्षोभ उसळला होता. अमेरिकेत वर्णभेद पूर्णतः नष्ट न झाल्याची टीका झाली होती. डेरेकला याहून अधिक शिक्षा द्यायला हवी होती, अशी सामान्यांची मागणी आहे. अर्थात एखाद्या कृष्णवर्णीय व्यक्तिच्या हत्येसाठी एवढी मोठी शिक्षा होणारी डेरेक ही पहिलीच व्यक्ती आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App