विशेष प्रतिनिधी
लखनौ : समाजवादी पक्षाचा उत्तर प्रदेशातील विधान परिषद निवडणुकीत सपाटून पराभव झाला आहे. या पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नेतृत्वक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.Defeat of Samajwadi Party is a question mark on the leadership of Akhilesh Yadav
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचा दारुण पराभव झाला होता. त्यापाठोपाठ झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. विधान परिषदेच्या ३६ जागावर झालेल्या निवडणुकीत सपाला एकही जागा मिळाली नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीत भाजपाने 27 पैकी 24 स्थानिक प्राधिकरणाच्या जागा भाज जिंकल्या.
याशिवाय भाजपनेनऊ जागा बिनविरोध जिंकल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. हा विजय भाजपच्या विकास मॉडेलवरील लोकांच्या विश्वासाचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे.राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार पाच वर्षांपासून अखिलेश यादव राजकारणात सातत्याने अपयशी ठरत आहेत.
अखिलेश यांनी वरिष्ठ नेत्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केला नाही तर लवकरच आजम खान आणि शफीकुर्रहमान बर्क यांच्यासारखे मोठे नेते पक्षाशी नाते तोडू शकतात. अखिलेश यांचे काका शिवपाल सिंह यादव यांनी सपापासून दूर राहण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत.
सपाचे नेतृत्व अखिलेश यांचे वडील मुलायम सिंह यांच्याकडे होते तेव्हा २०१२ मध्ये सपाने स्वबळावर सरकार स्थापन केले होते. २०१७ मध्ये अखिलेश यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी केली.
रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली सपा- काँग्रेसने एकत्र निवडणूक लढली. मात्र, ही आघाडी यशस्वी झाली नाही. २०१९ मध्ये अखिलेश यांनी बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यासोबत आघाडी केली. ही आघाडीही अयशस्वी झाली. आता विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा अखिलेश यांचा पराभव झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App