विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटनमध्ये भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कांस्य पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पहाटे काही समाजकंटकांनी हे कृत्य केलं. या घटनेवर भारतीय वाणिज्य दुतावासाने नाराजी व्यक्त करत घटनेचा निषेध केला आहे.Defamation of the statue of Mahatma Gandhi in New York
भारतीय वाणिज्य दुतावासाने या प्रकरणाची माहिती देताना म्हटले आहे की काही समाजकंटकांनी शनिवारी सकाळी हे कृत्य केलं. महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची तोडफोड करण्याच्या या घटनेचा वाणिज्य दूतावास तीव्र निषेध करतो. संबंधित प्रकरणाची तक्रार अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडे करण्यात आली आहे.
या घृणास्पद कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.गांधीजींच्या कांस्य पुतळ्याचे 2 ऑक्टोबर 1986 रोजी गांधींच्या 117 व्या जयंतीनिमित्त अनावरण करण्यात आले होते. गांधी मेमोरियल इंटरनॅशनल फाऊंडेशनने आठ फूट उंच पुतळा दान दिला होता. त्यानंतर मॅनहॅटनमध्ये गाधीजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.
2001 मध्ये पुतळा तिथून हटवण्यात आला होता. त्यानंतर 2002 मध्ये पुन्हा स्थापित करण्यात आला. गेल्या वषीर्ही काही अज्ञात हल्लेखोरांनी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये अशाच प्रकारे आणखी एका गांधी पुतळ्याची विटंबना केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App