विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सेमी फायनल निवडणुकांमध्ये भाजपने चार पैकी तीन राज्यात प्रचंड बाजी मारली आणि तेलंगणातही यशाचा पाया रचला. पण या निवडणुकांच्या दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आत्याचे निधन झाले, पण तरीदेखील ते कर्तव्यरत राहिले, याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना करून दिली. Death in his family still he word tirelessly pm on bjp president nadda
नड्डा यांची आत्या गंगादेवी शर्मा या हिमाचल प्रदेश मधल्या कुल्लूच्या रहिवासी होत्या. त्या 106 वर्षांच्या असताना त्यांचे निधन झाले. निवडणूक आयोगाने देशातल्या सर्वांत जेष्ठ मतदार म्हणून त्यांचा नुकताच सन्मान केला होता. 2022 च्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी अखेरचे मतदान केले होते.
या गंगादेवी शर्मा कुल्लू मध्ये राहत होत्या. जे. पी. नड्डा यांचे बालपण त्यांच्याच घरी गेले. नड्डांच्या वडिलांच्या त्या मोठ्या भगिनी. चार राज्यांचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना 13 नोव्हेंबर 2023 रोजी गंगादेवी यांचे निधन झाले. नड्डा यांनी ताबडतोब बिलासपूर येथे जाऊन त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले. परंतु, ते केल्यानंतर आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून ते ताबडतोब भाजपच्या प्रचारात सहभागी झाले.
या घटनेची आठवण पंतप्रधान मोदींनी काल भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना करून दिली. घरात निधन होऊनही आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा कर्तव्यरत राहिले, याबद्दल मोदींनी कृतज्ञता व्यक्त केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App