मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन कोची विमानतळावर पोहोचले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत प्राण गमावलेल्या ४५ भारतीयांचे मृतदेह भारतात पोहोचले आहेत. आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे मृतदेह घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान शुक्रवारी सकाळी केरळमधील कोची विमानतळावर पोहोचले.dead bodies of 45 Indians were flown to India from Kuwait via Kochi by Air Force aircraft
कुवेतमधील मंगफ शहरातील एका बहुमजली इमारतीला बुधवारी भीषण आग लागली. ज्यामध्ये ४५ भारतीयांना आपला जीव गमवावा लागला. याशिवाय फिलिपाइन्समधील तीन लोकही या आगीचे बळी ठरले. कुवेतमध्ये प्राण गमावलेल्या भारतीयांचे मृतदेह आणण्यासाठी हवाई दलाचे C-130J सुपर हर्क्युलस विमान गुरुवारी सकाळी केरळमधील कोची येथे पोहोचले.
कुवेतमधील इमारतीला लागलेल्या आगीत प्राण गमावलेल्या ४५ भारतीयांचे मृतदेह घेऊन हवाई दलाचे C-130J सुपर हर्क्युलस विमान कोची विमानतळावर पोहोचले. मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन कोची विमानतळावर पोहोचले.
कुवेतमध्ये लागलेल्या आगीत जीव गमावलेले बहुतांश नागरिक केरळचे रहिवासी आहेत. ४५ मृतांपैकी २३ लोक केरळचे रहिवासी होते. सात जण तामिळनाडूचे रहिवासी होते. तर उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येकी ३ जणांचा या आगीत मृत्यू झाला. कुवेतमधील एका इमारतीला लागलेल्या आगीत ओडिशातील दोन जणांचा मृत्यू झाला. याशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, झारखंड, बंगाल, पंजाब आणि हरियाणामधील प्रत्येकी एका नागरिकाचाही या आगीत मृत्यू झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App