वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू -काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सला (एनसी) आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा झटका बसला आहे. जम्मू विभागातील पक्षाचे अध्यक्ष देवेंद्र सिंह राणा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राणा यांची गणना नॅशनल कॉन्फरन्सच्या दिग्गज नेत्यांमध्ये केली जाते. यासोबतच माजी मंत्री सुरजीत सिंग सलाथिया यांनीही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.Davinder Singh Rana Resigned From Primary Membership Of National Conference
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते उद्या सुरजितसिंग सलाथिया यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी सलाथिया आणि राणा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. मात्र, त्यांनी या प्रकरणावर अधिक भाष्य केले नाही. राणा हे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होते.
आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी नॅशनल कॉन्फरन्ससाठी हा मोठा धक्का आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून राणा यांचा सूर काहीसा बदललेला होता. राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय होता. बुधवारी त्यांनी पक्षाध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला आणि उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांचीही भेट घेतली, त्यानंतर त्यांनी सांगितले की, जम्मू -काश्मीरच्या हितांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
ते म्हणाले होते की, जम्मूच्या लोकांना सर्व क्षेत्रांत विकास, रोजगार आणि सुशासनामध्ये समान अधिकार हवे आहेत. ते म्हणाले की, जम्मूचे हितसंबंध कमकुवत करण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत, परंतु लोकांनी जाती आणि धर्माचा भेदभाव न करता शांततापूर्ण आणि लोकशाही पद्धतीने त्यांचा संकल्प मजबूत केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App