विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते डॅनी डेन्झोंगपा आज त्यांचा ७४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. डॅनीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. डॅनी डेन्झोंगपा यांनी केवळ खलनायकच नव्हे तर चित्रपटांमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. Danny had rejected the role of Gabbar in ‘Sholay’
डॅनी डेन्झोन्ग्पा यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४८ गंगटोक, सिक्कीम मध्ये झाला. त्यांचे खरे नाव शेरिंग फिंटसो डेन्झोंगपा आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणारा अभिनेता डॅनीला कधीच हिरो व्हायचे नव्हते. वास्तविक सैन्यात भरती व्हायचे होते. पुण्यात लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात (आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज) मध्ये प्रवेशही मिळाला होता. पण आईने नकार दिल्याने ते तसे करू शकले नाहीत. आपल्या मुलाने सैन्यात भरती होण्याऐवजी कलाकार व्हावे अशी त्यांच्या आईची इच्छा होती.
डॅनी डेन्झोंगपा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, सैन्यात भरती होण्यास नकार दिल्यानंतर मी पुण्यातच एफटीआयआयमध्ये रुजू झालो. कोर्स फक्त अभिनयावर आधारित होता. जिथे संगीत आणि गायन हा अभ्यासक्रमाचा एक भाग होता. मला गायकही व्हायचे होते, पण नंतर कळले की संगीत हा अभ्यासक्रमाचाच एक भाग आहे. यानंतर डॅनी अभिनयाकडे अधिक वळले.
एफटीआय मध्ये शेरिंग फिंटसो डेन्झोंगपा नावाचा उच्चार करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे सह अध्यायी जया भादुरी यांनी नाव बदलून ‘डॅनी’ ठेवण्याचे सुचवले.
डॅनी डेन्झोंगपा यांना १९७० मध्येच जी. पी. सिप्पीच्या ‘शोले’ चित्रपटात गब्बर सिंगची भूमिका साकारण्याची ऑफर आली होती. पण, त्याने तिला नकार दिला. त्यानंतर अमजद खान यांना ही भूमिका मिळाली आणि ते खूप लोकप्रिय झाले. डॅनी यांना गब्बर सिंगची भूमिका ऑफर करण्यात आली तेव्हा ते अफगाणिस्तानमध्ये ‘धर्मात्मा’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यामुळेच त्यांनी ‘शोले’मध्ये काम करण्यास नकार दिला होता.
डॅनी आपल्या तत्त्वांवर ठाम असतात. त्यांच्याशी संबंधित लोक सांगतात की ते आजही पहाटे ५ वाजता उठतात आणि व्यायाम, योगासने करतात. त्यामुळे आजही वयाचा कोणताही परिणाम डॅनी यांच्या चेहऱ्यावर पडलेला नाही. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच डॅनी खूप चांगले टेबल टेनिसपटू आहेत. एक काळ असा होता जेव्हा अमिताभ बच्चन आणि टेनिस एकत्र खेळायचे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App