वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात वर्षभरात सायबर गुन्ह्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्या अंतर्गत खासगी बँक ग्राहकांनी १.३८ लाख कोटी गमावल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. cyber Crime increase in India; 1.38 lakh crore lotted
वैयक्तिक माहिती घेतल्यावर ही ऑनलाइन फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अज्ञात व्यक्तीला आपल्या बँकेचा तपशील देऊ नका. शिवाय आलेला ओटीपी कधीही शेअर करू नका. ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी गुन्हेगार रोज नवनवीन मार्ग अवलंबत आहेत. हे टाळण्यासाठी तुम्हाला स्वतःबद्दल जागरुक राहावे लागेल. तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका. RBI ने सांगितले आहे की गेल्या वर्षी खासगी बँकांच्या ग्राहकांशी १.३८ टलाख कोटी रुपये फसवणूक झाली आहे.
अनेक बँकांनी ऑनलाइन फसवणुकीमध्ये वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. बँकांनी काही निवडक जिल्ह्यांना बँक खाते उघडण्यापूर्वी केवायसी प्रक्रिया कडक करण्यास सांगितले आहे. बँक अधिकाऱ्यांनी सांगितले की, बनावट कागदपत्रे किंवा कागदपत्रांशी छेडछाड करून खाती उघडली जातात. ही खाती वापरून ग्राहकांची फसवणूक केली जाते. बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, फसवणूक कोठून केली जात आहे, याची माहिती गृह मंत्रालय घेऊ शकते, त्यानंतर त्या सर्व ठिकाणी नवीन बँक खाती उघडण्यासाठी वेगळी केवायसी प्रक्रिया असावी.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App