PIB ची फसवी वेबसाईटमागे कोण?सायबर गुन्हेगारांनी थेट पीआयबीचीच बनावट वेबसाईट तयार करुन ती वेबसाईट पीआयबी विभागाची अधिकृत असल्याचा दावा केला. CYBER CRIME: Central government’s Fake News Investigation Department also caught in cyber crime
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : cyber crime च्या अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात .फेक बातम्यांच फॅक्ट छेक करून आपल्या पर्यंत सत्य पोहचवन्याचे काम पिआयबी ही सरकारी वृत्तसंस्था करते .डिजीटल क्रांतीच्या या काळात अफवांचं (Fake News) पेव सुटलंय. खोट्या गोष्टी खऱ्या करुन प्रसारित केल्या जात आहेत. यावरच लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारचा पिआयबी हा विभाग फॅक्ट चेकिंगचं (Fact Check) काम करत असतो. मात्र, आता फसवणूक करणाऱ्यांनी या विभागालाही सोडलेलं नाही. सायबर गुन्हेगारांनी थेट पीआयबीचीच बनावट वेबसाईट तयार करुन ती वेबसाईट पीआयबी विभागाची अधिकृत असल्याचा दावा केला. मात्र, पीआयबीने हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने याबाबत नागरिकांना माहिती देत सावध केलं आहे .
A website "https://t.co/S9SxZ50iRu" is falsely claiming to be the official website of #PIBFactCheck Don't fall for these fraudulent websites!❌ Follow @PIBFactCheck to stay updated with fact checks related to the Government of India or visit: https://t.co/D9HAmFgqYO. pic.twitter.com/ghwlGNMjbz — PIB Fact Check (@PIBFactCheck) May 23, 2021
A website "https://t.co/S9SxZ50iRu" is falsely claiming to be the official website of #PIBFactCheck
Don't fall for these fraudulent websites!❌
Follow @PIBFactCheck to stay updated with fact checks related to the Government of India or visit: https://t.co/D9HAmFgqYO. pic.twitter.com/ghwlGNMjbz
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 23, 2021
PIBFactCheck ने याबाबत ट्विट करत सांगितलं, “काही लोकांनी http://pibfactcheck.in” नावाची वेबसाईट बनवलीय. त्यांच्याकडून ही वेबसाईट पीआयबी फॅक्ट चेकची अधिकृत वेबसाईट असल्याचा दावा करण्यात आलाय.” हे सांगतानाच पीआयबीने लोकांना या वेबसाईटच्या प्रभावात न येण्याचं आवाहन केलंय.
“केंद्र सरकारशी संबंधित कोणत्याही खोट्या माहितीची किंवा अफवांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी ट्विटरवर @PIBFactCheck ला फॉलोव करु शकता. तसेच https://pib.gov.in/factcheck.aspx या वेबसाईटला भेट देऊ शकता,” असंही पीआयबीने नमूद केलं. इतकंच नाही यावेळी पीआयबी फसवणूक करणाऱ्या वेबसाईटची एक यादीच जाहीर केली.
फसवणूक करणाऱ्या वेबसाईट्स
1. http://centralexcisegov.in/aboutus.php 2. https://register-for-your-free-scholarship.blogspot.com/ 3. https://kusmyojna.in/landing/ 4. https://www.kvms.org.in/ 5. https://www.sajks.com/about-us.php 6. https://register-form-free-tablet.blogspot.com/
या बनावट वेबसाईटवर पीआयबीच्या माहितीचा उपयोग करुनच अनेक बातम्या करण्यात आलेल्या आहेत. या वेबसाईटवर ही वेबसाईट एका ऑनलाईन मीडिया हाऊसची असल्याचं म्हटलंय. त्यांनी त्याबाबत सविस्तर लिहिलं आहे. संपादकाचं नाव प्रवीण असं देण्यात आलंय.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App