Sachin Vaze Case : सचिन वाझेंना घेऊन NIA ने क्राइम सीन केला रिक्रिएट, पीपीई किट घालायला लावून ‘त्याच’ मार्गावर चालायला लावले

Sachin Vaze Case: NIA Recreates crime scene with Sachin Vaze Near Antilia

मुंबईतील अँटिलिया प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) चौकशी सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री एनआयएने घटनास्थळी क्राइम सीन रिक्रिएट केला. यावेळी आरोपी सचिन वाझे यांना पीपीई किट घालायला लावून त्याच रस्त्यावर चालायला लावण्यात आले. देशातील धनाढ्य उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आलिशान घराजवळ एका स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्याप्रकरणी चौकशी करत आहे. तपासणीदरम्यान अँटिलियाभोवती बॅरिकेडिंग करण्यात आले होते. Sachin Vaze Case: NIA Recreates crime scene with Sachin Vaze Near Antilia


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील अँटिलिया प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) चौकशी सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री एनआयएने घटनास्थळी क्राइम सीन रिक्रिएट केला. यावेळी आरोपी सचिन वाझे यांना पीपीई किट घालायला लावून त्याच रस्त्यावर चालायला लावण्यात आले. देशातील धनाढ्य उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आलिशान घराजवळ एका स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्याप्रकरणी चौकशी करत आहे. तपासणीदरम्यान अँटिलियाभोवती बॅरिकेडिंग करण्यात आले होते.

तपासादरम्यान एनआयएच्या अधिकाऱ्यांनी घटनेच्या सभोवतालचा परिसर घेरला आणि क्राइम सीन पुन्हा रिक्रिएट केला. एनआयएच्या पथकाने स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवलेल्या अँटिलिया जवळच्या भागाला भेट दिली. यावेळी दोन्ही बाजूंनी रस्ता रोखण्यात आला होता. त्याचवेळी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना घटनास्थळावरून चालायला लावण्यात आले.एनआयएने सचिन वाझे यांना पीपीई किट परिधान करायला लावले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक माणूस पीपीई किटमध्ये फिरताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

यापूर्वी अँटिलीया प्रकरणात एनआयएने विशेष न्यायालयात दावा केला होता की, सचिन वाझे तपासात सहकार्य करत नाहीत. एनआयएने म्हटले की, कोर्टाच्या वतीने असे सांगण्यात आले होते की जेव्हा वाझे यांची चौकशी होईल, तेव्हा त्यांचे वकील हजर असतील. परंतु एनआयएने कोर्टाला सांगितले की, चौकशीदरम्यान त्यांचे वकील येत नाहीत. यामुळे वाझे यांची चौकशी होऊ शकत नाहीये.

त्याचवेळी एनआयएच्या पथकाने शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली. यादरम्यान एनआयएने आयुक्तांकडे चौकशीत सहकार्य करण्याची मागणी केली आहे.

Sachin Vaze Case: NIA Recreates crime scene with Sachin Vaze Near Antilia

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था