Cyber attack : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सायबर हल्ला!

Cyber attack

इलॉन मस्क यांनी केली पुष्टी; म्हणाले, अनेक मोठे देश यात सहभागी आहेत


नवी दिल्ली : Cyber attack सोमवारी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) च्या सेवा काही काळासाठी बंद होत्या. इंटरनेट सेवांच्या खंडिततेचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइट Downdetector.com नुसार, अमेरिकेतील २१,००० हून अधिक युजर्सनी आणि यूकेमधील १०,८०० हून अधिक युजर्सनी या अडचणीबाबत तक्रार केली आहे. अहवालांनुसार, वापरकर्त्यांना X वर संदेश पाठवताना, ट्विट पोस्ट करताना आणि टाइमलाइन रिफ्रेश करताना समस्या येत होत्या.Cyber attack

याबाबत इलॉन मस्क यांनी म्हटले आहे की एक्सवर सायबर हल्ला झाला आहे आणि त्यात अनेक मोठे गट किंवा देश सामील आहेत. मस्क म्हणाले की आपल्याला दररोज अनेक हल्ल्यांचा सामना करावा लागतो, परंतु हे खूप तयारीने केले गेले आहे.



डाउनडिटेक्टरला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आउटेजबद्दल हजारो युजर्सकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासोबतच, काही युजर्सनी फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या साइट्सवर X डाऊन असल्याच्या तक्रारी देखील पोस्ट केल्या आहेत.

या आउटेजमुळे, इलॉन मस्कचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पूर्णपणे क्रॅश झाला, ज्यामुळे युजर्स नवीन पोस्ट करू शकले नाहीत किंवा पेज उघडू शकले नाहीत. यासोबतच, संदेश पाठवू शकत नव्हते.

Cyber attack on social media platform X

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात