विशेष प्रतिनिधी
मुंबई : दहशत माजविण्यासाठी तलवारी नाचवणे, तलवारीने केक कापणे यासारखरी कृत्ये गुंड करतात. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनीही आपल्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी तलवारीने केक कापला. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Cutting a cake with a sword, crime against Samajwadi Party MLA Abu Azmi
आझमी यांच्यासह काही कार्यकर्त्यांवर मुंबईत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तलवारीने केक कापणे आणि करोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आझमी यांनी रविवारी ५.१५ ते ८.३५ वाजताच्या दरम्यान त्यांच्या जन्मदिवसानिमित्त शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी २५ ते ३० कार्यकर्त्यांचा जमाव करून शासनाच्या करोना प्रादुर्भाव प्रतिबंधक आदेश व जमावबंदी आदेशाचा भंग केला.
अबू आझमी व समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते फवाद खान ऊर्फ आझमी यांनी विनापरवाना तलवार हे हत्यार बाळगलं आहे. याप्रकरणी पोलिसांकडून फिर्याद दाखल करून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App