Tokyo Olympics चा रंगतदार समारोप, बजरंग पुनियाच्या हाती भारताचा तिरंगा, आता तीन वर्षांनी पॅरिसमध्ये भिडणार चॅम्पियन्स

Tokyo Olympics 2021 Closing Ceremony : Bronze Medallist Bajrang Punia Was India Flag Bearer

Tokyo Olympics 2021 Closing Ceremony : 23 जुलैपासून सुरू झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप रविवारी रंगतदार कार्यक्रमाने झाला. जगभरातील खेळाडू आता तीन वर्षांनंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एकत्र येतील. टोकियो ऑलिम्पिकचा समारोप सोहळा आतषबाजीने सुरू झाला. संपूर्ण ऑलिम्पिक स्टेडियमला सुंदर सजवण्यात आले होते. समारोप समारंभात भारतातील 10 खेळाडू आणि अधिकारी सहभागी झाले होते. Tokyo Olympics 2021 Closing Ceremony: Bronze Medallist Bajrang Punia Was India Flag Bearer


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 23 जुलैपासून सुरू झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप रविवारी रंगतदार कार्यक्रमाने झाला. जगभरातील खेळाडू आता तीन वर्षांनंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एकत्र येतील. टोकियो ऑलिम्पिकचा समारोप सोहळा आतषबाजीने सुरू झाला. संपूर्ण ऑलिम्पिक स्टेडियमला सुंदर सजवण्यात आले होते. समारोप समारंभात भारतातील 10 खेळाडू आणि अधिकारी सहभागी झाले होते.

कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी भारतीय दलाचे नेतृत्व केले. समारोप समारंभात बजरंगच्या हातात तिरंगा होता. टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी संस्मरणीय ठरले आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतीये संघाने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी सादर केली आहे. भारताने 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदकांसह 7 पदके जिंकली.

आतषबाजीने समारोपाची सुरुवात

कोविड -19 साथीच्या दरम्यान आयोजित 32 व्या ऑलिम्पिक खेळांचा समारोप रंगतदार समारंभाने झाला. यात पुढे जाण्याचा संदेश देण्यात आला. समारोप समारंभाची सुरुवात एका व्हिडिओने झाली, ज्यात 17 दिवसांच्या कार्यक्रमांचा सारांश होता.

अंतिम अध्यायाची सुरुवात स्टेडियममध्ये फटाक्यांच्या आतषबाजीने झाली, आयोजकांनी ‘अगणित व्यक्तींविषयी कृतज्ञता’ व्यक्त केली, ज्यांनी ऑलिम्पिक क्रीडा समारंभाला समारोपापर्यंत नेण्यास मदत केली. यानंतर जपानचे क्राउन प्रिन्स अकिशिनो आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख अधिकृत स्टँडमध्ये दिसले.

सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये फोकस हा रेकॉर्ड आणि स्कोअरवर नव्हता, तर कोरोना चाचण्या दररोज घेत असलेल्या कठोर बायो-बबलमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंच्या धाडसी प्रयत्नांवर होता. सोहळ्याचा मुख्य संदेश असा होता की, हे खेळच उज्ज्वल भविष्यासाठी दरवाजे उघडतील.

भारत निश्चितपणे सात पदकांसह उज्वल भविष्याकडे पाहू शकतो, भालाफेकपटू नीरज चोप्रा याने 13 वर्षांनंतर पहिले सुवर्ण जिंकले, जे गेम्समधील ट्रॅक अँड फील्ड इव्हेंटमधील देशातील पहिले पदक आहे.

टोकियो 2020 च्या अध्यक्षांकडून खेळ भावनेची प्रशंसा

टोकियो 2020 चे अध्यक्ष सेको हाशिमोटो म्हणाले की, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांचा खेळांशी काहीही संबंध नाही. शुक्रवारी टोकियोमध्ये 4,066 प्रकरणे नोंदवली गेली. ऑलिम्पिक खेळ संपल्यानंतर पॅरालिम्पिक दरम्यान प्रेक्षकांना परवानगी द्यायची की नाही हे आयोजकांना ठरवावे लागेल. हाशिमोटो म्हणाले की, त्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. पॅरालिम्पिक 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान होणार आहे.

Tokyo Olympics 2021 Closing Ceremony Bronze Medallist Bajrang Punia Was India Flag Bearer

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण