वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बाहुबली चित्रपटानंतर अभिनेता प्रभास हा आदिपुरुष या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांसमोर येत आहे. तो चक्क प्रभू रामचंद्र यांच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. Curiosity of Adipurush film after Bahubali; Actor Prabhas will be seen in the role of Prabhu Ramchandra
प्रभासचा हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट मानला जात आहे. प्रभास भगवान रामाच्या , तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. आता हा चित्रपट पोस्ट प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. पण या चित्रपटासाठी भूषण कुमार कोणती तारीख फायनल करणार आहे हे पाहावे लागेल.
दरम्यान, दिवाळी वीकेंडमध्ये हा चित्रपट रिलीज होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ‘पिंकविला’शी झालेल्या संवादात भूषण कुमार यांना ‘आदिपुरुष’ चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होण्याबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, ‘आम्ही अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित केलेली नाही. एकदा आम्ही ठरवले की आम्ही ते जाहीर करू.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App