केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी शौर्याची शर्थ केली. विजापूर चकमकीत सातशे ते साडेसातशे प्रशिक्षित नक्षलवाद्यांशी लढताना त्यांच्यातील ३० जणांचा खात्मा केला, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप सिंग यांनी सांगितले. या चकमकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा गलथानपणा झाला असल्याचाही त्यांना इन्कार केला.CRPF jawans bravery, 30 killed while fighting between 700 and 700 trained Naxalites
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी शौर्याची शर्थ केली. विजापूर चकमकीत सातशे ते साडेसातशे प्रशिक्षित नक्षलवाद्यांशी लढताना त्यांच्यातील ३० जणांचा खात्मा केला,
अशी माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप सिंग यांनी सांगितले. या चकमकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा गलथानपणा झाला असल्याचाही त्यांना इन्कार केला.सिंग म्हणाले, इंटेलिजन्स, ऑपरेशन किंवा रेस्क्यूमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नव्हती.
परंतु, सातशे- साडेसातशे प्रशिक्षित नक्षलवादी समोर होते. तरीही जवानांनी शस्त्र पळवून नेऊन दिली नाहीत. जखमी जवानांनाही सुखरुप परत आणले. सिंग म्हणाले, विजापूरजवळील गावात मोठ्या संख्येने नक्षलवादी असल्याचे आम्हाला समजले होते.
त्यामुळे कोब्रो बटालियनसह बस्तारिया बटालियनची संयुक्त कारवाई करण्याची योजना आम्ही आखली होती. या मोहीमेत साडेचारशे जवान सहभागी झाले होते. हे शोध अभियान होते. सुरक्षादले तीन एप्रिलला विजापूर परिसरात पोहोचली. सकाळच्या उजेडात त्यांनी शोधमोहीम सुरू केली.
ते परतत असताना नक्षलवाद्यांनी दबा धरून हल्ला केला. रॉकेट लॉँचर आणि लाईट मशीनगनसह स्वयंचलित रायफलमधून गोळीबारा सुरू केला. सुमारेसातशे ते साडेसातशे नक्षलवादी होते. तरीही जवानांनी त्यांच्याशी लढा दिला. त्यांचा घात उधळून लावला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App