पाकिस्तानात बसून भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त!

न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी केली कारवाई.


विशेष प्रतिनिधी

बारामूल्ला : पाकिस्तानमधून भारतविरोधी कारवाया करणाऱ्या पाच दहशतवाद्यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती पोलिसांनी जप्त केली आहे. स्थानिक न्यायालयाने दिलेल्या जप्तीच्या आदेशाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.Crores worth of property seized from terrorists doing anti India activities in Pakistan

ज्या दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली त्यात बशीर अहमद गनी रा. तिलगाम, मेहराज उद दिन रा. लोन खरगाम, गुलाम मोहम्मद यातू रा. तिलगाम, अब्दुल रहमान भट रा. वनीगाम पेन आणि अब्दुल रशीद रा. लोन सत्रेसिरान यांचा समावेश आहे.



हे सर्वजण अनेक वर्षांपूर्वी सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. आता तिथे बसून ते काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्याचा कट रचत आहेत. त्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेत 9 कनाल जमिनीचाही समावेश आहे. क्रीरी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

बारामुल्ला पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईदरम्यानकुख्यात अमली पदार्थ तस्कर हिलाल अहमद वानी याचे बारझुल्ला कुंजर भागात असलेले घर जप्त केले आहे. त्याची किंमत अंदाजे 22 लाख रुपये आहे. प्राथमिक तपासात पोलिसांना ही मालमत्ता अमली पदार्थांच्या तस्करीतून कमावलेल्या पैशातून मिळवल्याचे निष्पन्न झाले.

Crores worth of property seized from terrorists doing anti India activities in Pakistan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात