विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारताच्या अर्थव्यवस्थेत घालेल 220 अब्ज रुपयांची भर!!; इकॉनॉमिक्स्टचा अंदाज

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आज पासून सुरू झालेली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि आगामी दोन-तीन महिन्यांमधला सणासुदीचा सिझन यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत तब्बल 220 अब्ज रुपये यांची भर पडेल, असा सकारात्मक अंदाज इकॉनॉमिक्स्टने व्यक्त केला आहे. Cricket World Cup may add $2.6 billion to Indian economy

याचे विश्लेषण देखील त्यांनी सखोल केले आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि सणासुदीचे दिवस यामुळे देशांतर्गत तसेच प्रदेशातून भारतात पर्यटन तब्बल 2.5 % वाढेल ते सध्या ते 6 % आहे, ते 8.5 % पर्यंत पोहोचेल. यात प्रामुख्याने वाटा परदेशी पर्यटकांचा असेल. त्यामुळे देशात इव्हेंट मॅनेजमेंट पासून ट्रॅव्हल पर्यंत आणि हॉस्पिटलिटी इंडस्ट्री पर्यंत सर्वांचा फायदा होईल. स्क्रीनिंग पासून फूड डिलिव्हरी पर्यंत 50 % वाढ होईल.

टेलिव्हिजन आणि वेगवेगळ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर तब्बल 552 मिलियन भारतीय प्रेक्षक विश्वचषक क्रिकेट स्पर्धा बघतील. 105 ते 120 अब्ज रुपयांचा महसूल स्पॉन्सरशिप आणि जाहिराती या माध्यमातून मिळू शकेल.

सणासुदीचे दिवस असल्याने रिटेल पासून ठोक व्यापारापर्यंत तेजी असेलच, पण त्यातही क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची भर पडून लोकांच्या खरेदी प्रवृत्ती 25 % पर्यंत वाढतील, असा अंदाज आहे. यामध्ये 0.15 ते 0.25 % महागाई दर वाढण्याची शक्यताही गृहीत धरली आहे.

ट्रॅव्हल्स पासून हॉस्पिटलिटी इंडस्ट्री पर्यंत वेगवेगळ्या महसुली उत्पन्नातून केंद्र सरकारचे कर उत्पन्न देखील वाढण्याची खात्री इकॉनॉमिस्टने दिली आहे. केंद्र सरकारच्या उत्पन्नात झालेली ही कररूपी महसूली वाढ निवडणूक वर्षात वेगवेगळ्या सरकारी सेवा उपक्रमांमध्ये गुंतविण्याचे प्रमाण 20 % पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यातून निवडणुकीची सही दिशा आणि नीती स्पष्ट होत आहे.

Cricket World Cup may add $2.6 billion to Indian economy

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात