याच श्रेय जात फक्त आसनसोलच्या दीपनारायण नायक यांना , कारण नायक यांनी पश्चिम वर्धमान जिह्यातील 12 गावांतील घरांच्या भिंतींना फळ्यामध्ये रूपांतरित केलंय.Creative fruit on the walls of each house, the names of the fruits on it, the side and the alphabet; Deepnarayan Nayak’s record in 12 villages
विशेष प्रतिनिधी
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये जोबा ओटपारा हे एक आदिवासी गाव आहे. गावातील अधिकतर लोक अशिक्षित आहेत. मात्र आता हेच आदिवासी गाव आज स्वतःची नवीन कहाणी लिहीत आहे.दरम्यान गावातील प्रत्येक घराच्या भिंतींवर सुंदर आणि क्रिएटिव्ह फळे आहे. त्यावर फळ्यांवर फळाफुलांची नावे, पाढे आणि वर्णमाला असं बरंच काही आहे.
विशेष म्हणजे लहान मुलांसोबत त्यांचे आईबाबाही शिकत आहेत.दरम्यान मुलंच आपल्या पालकांना शिकवताना दिसत आहेत. परंतु याच श्रेय जात फक्त आसनसोलच्या दीपनारायण नायक यांना , कारण नायक यांनी पश्चिम वर्धमान जिह्यातील 12 गावांतील घरांच्या भिंतींना फळ्यामध्ये रूपांतरित केलंय. दीपनारायण एकटय़ाने हा उपक्रम चालवतात.नायक यांच्या कार्याची देशभरात प्रशंसा होत आहे.35 वर्षीय दीपनारायण नायक यांनी फार्मसी आणि बी.एड.चे शिक्षण घेतलंय.
या उपक्रमाविषयी नायक म्हणाले की , कोरोना काळात शाळा बंद झाल्या होत्या अशा वेळी मुलांचे शिक्षण थांबले होते . दरम्यान त्यांच्या शिक्षणासाठी भिंतीचे फळे करण्याची कल्पना सुचली आणि एका गावात प्रयोग केला. तो यशस्वी ठरल्यावर अन्य 11 गावांमध्येही पुनरावृत्ती केली.दररोज तीन ते चार गावांमध्ये जातात. ज्या दिवशी ते एखाद्या सेंटरवर जाऊ शकत नाहीत, तिथे मुले स्वतःच अभ्यास करतात. मुलांना वह्या, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचेही वाटप करतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App