
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या कोणत्याही कार्यक्रमांना, उपक्रमांना विरोध करत राहणे म्हणजे लोकशाही असल्याची नवी व्याख्या विरोधी पक्षांनी सध्या केली आहे. भारतामध्ये होणार असलेल्या G20 शिखर परिषदेला विरोध दाखवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयात We20 अशी “उच्चशिक्षित” विरोधी बैठक आज झाली. या बैठकीत कम्युनिस्ट काँग्रेस आणि लिबरल पक्षांचे “उच्चशिक्षित” नेते देखील सहभागी झाले. CPM and Congress organized we20 meeting against proposed G20 meeting in new delhi
मात्र ही बैठक होऊनही त्यांची मोदी सरकार विरुद्धची तक्रारखोरी थांबली नाही. याचे प्रत्यंतर काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांच्या ट्वीट मधून आले. काँग्रेस सरकारे असताना राजधानी दिल्लीत 1983 मध्ये अलिप्त देशांची शिखर परिषद झाली होती. त्यानंतर कॉमनवेल्थ देशांची बैठकही झाली होती. परंतु काँग्रेस सरकारने त्याचा निवडणुकीचा राजकारणासाठी वापर केला नव्हता. सध्या मोदी सरकार g20 च्या शिखर परिषदेचा वापर निवडणुकीसाठी करते आहे असा आरोप रमेश यांनी केला.
वास्तविक विकसित आणि विकसनशील देशांचा समूह ग्रुप 20 अर्थात G20 देशांची शिखर परिषद नवी दिल्लीत होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली 20 देशांचे प्रमुख या बैठकीला हजर राहणार आहेत. त्याची सरकारी पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. वास्तविक सर्व देशांना या परिषदेचे यजमानपद मिळत असते तसे यजमानपद 2023 मध्ये भारताला मिळाले आहे पण या g20 च्या बैठकीच्या निमित्ताने बदलत्या भारताची शोकेस 20 देशांच्या राष्ट्रप्रमुखांपुढे आणि त्यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळापुढे ठेवावी यासाठी मोदी सरकार विशिष्ट कॅम्पेन करीत आहे.
या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला आपला विरोध दर्शवण्यासाठी करत We20 असे म्हणत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दिल्लीतले मुख्यालय सुरजित भवन येथे विरोधकांची बैठक आयोजित केली. या बैठकीत नेहमीप्रमाणे मोदी सरकारवर शरसंधान साधले. पण प्रत्यक्षात g20 चा श्लेष म्हणून We20 असे नाव देऊन बैठक घेणे या पलीकडे त्यात दुसरे काही नव्हते. पण जयराम रमेश यांनी मात्र ट्विट करून या बैठक महत्व वाढविण्याचा प्रयत्न केला. या बैठकीला येण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंध केल्याचा दावा रमेश यांनी केला.
हे ट्विट असे :
जयराम रमेश @जयराम_रमेश CPM च्या मालकीच्या इमारतीत आम्ही, द पीपलचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या We20 सभेला दिल्ली पोलीस लोकांना उपस्थित राहण्यापासून रोखत आहे हे विलक्षण आहे. बैठक पूर्णपणे शांततेत आहे. रस्त्यावर आंदोलने नाहीत. दिल्ली पोलिसांचे ऑपरेशन सुरू होण्यापूर्वी मी सकाळी 10:30 वाजता आत जाण्यात यशस्वी झालो, पण आता बाहेर पडणे कठीण होते. ही नवी भारताची लोकशाही आहे.
याचा अर्थ जयराम रमेश सामील झालेल्या We20 बैठकीचे एवढे महत्त्व होते, की जणू काही त्यांनी विरोध केल्यामुळे G20 बैठकीला मोठा खोडाच बसला असता!! त्यामुळे पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करून ही बैठक होण्यात अडथळा आणला, असा दावा या ट्वीट मधून दिसतो.
प्रत्यक्षात g20 मध्ये सहभागी होणारे 20 देशांचे राष्ट्राध्यक्ष, त्यांच्याबरोबरची शिष्टमंडळे कुठे आणि मोदी सरकारला सगळ्याच बाबतीत फक्त विरोध आणि विरोधच करणारे कम्युनिस्ट आणि काँग्रेस नेते कुठे!!, अशी खिल्ली अनेकांनी सोशल मीडियावर उडवली आहे.
CPM and Congress organized we20 meeting against proposed G20 meeting in new delhi
महत्वाच्या बातम्या
- ‘’आगामी निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास नितीन गडकरी …’’ रोहित पवारांचं मोठं विधान!
- द फोकस एक्सप्लेनर : राष्ट्रवादी नेमकी कुणाची? निवडणूक आयोग कोणत्या आधारावर घेते निर्णय? वाचा सविस्तर
- PM Jan Dhan Yojana : जन धन खात्यांची संख्या ५० कोटींच्या पुढे, सरकारने सांगितले इतके लाख कोटी रुपये जमा
- पंतप्रधान मोदी दोन दिवसीय दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार; ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार