महाराष्ट्राच्या पहिल्या उद्योग रत्न पुरस्काराने रतन टाटा सन्मानित; पाहा फोटो फीचर


प्रतिनिधी

मुंबई : भारतातील उद्योग क्षेत्राचा कणा असलेल्या टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष, उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. रतन टाटा यांच्या मुंबईतील हालकाई बंगल्यात अत्यंत साधेपणाने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.Ratan Tata honored with Maharashtra’s first Udyog Ratna award; See photo feature


 

याप्रसंगी रतन टाटा यांचे शाल पुष्पगुच्छ, उद्योग रत्न पुरस्कारानचे सन्मानचिन्ह तसेच २५ लाख रुपयांचा धनादेश आणि खास तयार करण्यात आलेले रतन टाटा यांचे पोट्रेट त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सन्मानपूर्वक प्रदान केले. उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी टाटा यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले.

 

यासमयी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि “मित्रा” या राज्य शासनाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष टी. चंद्रशेखर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा उपस्थित होते.

Ratan Tata honored with Maharashtra’s first Udyog Ratna award; See photo feature

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात