वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतातून ये-जा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध ३१ ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे. Covid-19: India extends international flight ban until October 31
भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गेल्या १८ महिन्यांपासून हे निर्बंध लागू आहेत. याबाबत ‘डीजीसीए’ने मंगळवारी अधिकृत शासन निर्णय जाहीर केला. त्यानुसार, आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत कायम राहतील. त्यापुढील निर्णय कोरोनास्थितीनुरूप घेण्यात येईल.
मात्र, मालवाहू (कार्गो) विमानांचे प्रचलन कोणत्याही बंधनाविना सुरू राहील. शिवाय, निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांवर नियोजित फेऱ्या मर्यादित स्वरूपात चालविण्यात येतील. त्याचा निर्णय ‘केस टू केस’ तत्त्वावर प्राधिकरणाकडून घेतला जाईल.
तथापि, वंदे भारत अभियान आणि एअर बबल करारांतर्गत सुरू असलेली उड्डाणे वेळापत्रकानुसार प्रचनल करतील. सरकारी मापदंडांनुसार पात्र नागरिक त्या माध्यमातून भारतात ये-जा करू शकतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारताने १८ हून अधिक देशांशी एअर बबल करार केले असून, त्याअंतर्गत दोन्ही देशांतील प्रमुख विमान कंपन्यांना आठवड्यातून ठरावीक दिवस पूर्वनियोजित फेरी चालविण्यास परवानगी देण्यात येते.
pic.twitter.com/FTA6H8EgVw — DGCA (@DGCAIndia) September 28, 2021
pic.twitter.com/FTA6H8EgVw
— DGCA (@DGCAIndia) September 28, 2021
भारताने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध आणखी वाढवू नयेत, असे आवाहन आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेद्वारे करण्यात आले होते. मात्र, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि काही देशांत रुग्णवाढ होऊ लागल्याने खबरदारी म्हणून डीजीसीएने हा निर्णय घेतल्याचे वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले. हे निर्बंध २३ मार्च २०२० पासून लागू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App