परदेशात जायचंय, या ४९ शहरांसाठी उपलब्ध आहे विमानसेवा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय नागरिकांना परदेशात जाण्यासाठी सरकारने १८ देशांनी एअर बबल करार केले आहेत. त्यनुसार ४९ शहरांमध्ये विमानसेवा सुरू असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली आहे. सप्टेंबर महिन्यात ही सेवा उपलब्ध असणार आहे.Airlines are available for these 49 cities if you want to travel abroad

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ३० सप्टेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीला बंदी आहे. मात्र, भारताने भारताने अमेरिका, यूके, यूएई, केनिया, भूतान आणि फ्रान्ससह सुमारे 28 देशांसह हवाई-बबल करार तयार केले आहेत. या देशांमध्ये भारतीय नागरिक जाऊ शकतील. त्यासाठी प्रवाशांना एअर इंडियाची वेबसाइट, एअर इंडियाची कार्यालये आणि ट्रॅव्हल एजंट्सद्वारे तिकीट बुक करणे आवश्यक आहे.



एअर-बबल कराराचा एक भाग म्हणून, भारताने 3 सप्टेंबर रोजी बांगलादेशसोबत विमानसेवा पुन्हा सुरू केली. पुढील शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध असणार आहे. 1. अफगाणिस्तान-काबूल, 2. बहरीन-बहरीन, 3.बांगलादेश-ढाका, 4. कॅनडा-टोरोंटो आणि व्हँकुव्हर, 5. फ्रान्स-पॅरिस, 6. जर्मनी-फ्रँकफर्ट, 7. जपान-नरीता,

8. केनिया-नैरोबी, 9. कुवैत-कुवैत,10. मालदीव-माले, 11. नेपाळ-काठमांडू, 12. ओमान-मस्कट, 13. रशिया-मॉस्को, 14. श्रीलंका-कोलंबो, 15. युएई-दुबई आणि अबू धाबी, 16. यूके-लंडन आणि बर्मिंगहॅम,
17. यूएसए-शिकागो, वॉशिंग्टन, नेवार्क आणि सॅन फ्रान्सिस्को.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २३ सप्टेंबरपासून विमान उड्डाणे बंद आहेत. भारतीय विमानसेवा आणि विमानतळांना आर्थिक वर्ष 2021 मध्ये, 22,400 कोटींचे आर्थिक नुकसान झाले कारण देशाने कोविड महामारीमुळे 23 मार्च रोजी विमान उड्डाणे बंद केली. देशांतर्गत विमान सेवा मे 2020 मध्ये पुन्हा सुरू झाली. एअर बबल करार आणि वंदे भारत मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवली गेली.

Airlines are available for these 49 cities if you want to travel abroad

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात