विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस डबल म्युटंट स्ट्रेनचा देखील ती प्रभावीपणे सामना करू शकते असे आयसीएमआरच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. आयसीएमआर- राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांनी या लसीची परिणामकारकता सिद्ध करून दाखविली आहे. Covaccine ffective on doubl mutant also
या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष हाती आले आहेत. ही लस सौम्य, मध्यम आणि तीव्र कोरोना लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर देखील परिणामकारक असून तिची प्रतिकारक्षमता ही ७८ टक्के एवढी आहे. या लसीच्या प्रभावामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचे रुग्णालयामध्ये दाखल होण्याचे प्रमाण देखील कमी होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने भारत बायोटेकने तयार केलेल्या या लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. जगातील अन्य देश साठ देश देखील या लसीचा वापर करण्याच्या विचारात आहेत.
‘सार्स-कोविड-२’ चे विविध स्ट्रेन सध्या देशभर धुमाकूळ घालत असून त्यामध्ये बी.१.१.७ (ब्रिटिश), बी.१.१.२८ (ब्राझील) आणि बी.१.३५१ (दक्षिण आफ्रिकेतील) या स्ट्रेन्सचा समावेश आहे. सर्वाधिक संसर्गजन्य समजल्या जाणाऱ्या ब्रिटिश आणि ब्राझीलमधील कोरोना विषाणूला रोखण्याचे पूर्ण सामर्थ्य या लसीमध्ये असल्याचे सिद्ध झाले आहे.
महत्वाच्या’ बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App