विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकजनशक्ती पक्षाच्या लोकसभेतील नेतेपदी पशुपतीकुमार पारस यांची नियुक्ती करण्याच्या लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला चिराग पासवान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाने चिराग पासवान यांची याचिका फेटाळून लावली आहे.Court rejects Chirag Paswan’s plea challenging his uncle’s appointment as Lok Janshakti leader
गेल्या दोन महिन्यांपासून बिहारमधील एक प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षातील हा अंतर्गत वाद चचेर्चा विषय ठरला आहे. चिराग पासवान यांना बाजूला सारत पशुपतीकुमार पारस यांनी पक्षातल्याच त्यांच्या समर्थकांना हाताशी धरून स्वत:ची लोकसभेतील पक्षनेतेपदी निवड करून घेतली.
यानंतर थेट केंद्रीय मंत्रिमंडळात पशुपतीकुमार पारस यांची वर्णी लागली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांसोबतच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पशुपतीकुमार पारस यांच्या राजकीय धोरणांना एक प्रकारे समर्थनच दिल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पशुपतीकुमार पारस यांच्या पक्षनेतेपदाला मंजुरी देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका चिराग पासवान यांनी केली होती. मात्र, संसदेच्या सभागृहातील वाद सोडवणे किंवा त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार हा लोकसभा अध्यक्षांनाच असतो. त्यामुळे ही याचिका निराधार ठरते, असे म्हणत दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
लोकजनशक्ती पाटीर्चे लोकसभेत एकूण ६ खासदार आहेत. त्यात चिराग पासवान आणि पशुपतीकुमार पारस या दोघांसह इतर ४ खासदार आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी पशुपतीकुमार पारस यांनी इतर ४ खासदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन स्वत:ला पक्षनेता म्हणून घोषित केलं.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील त्यांच्या नावाला संमती दिली. दुसरीकडे चिराग पासवान यांनी संतप्त होत पशुपतीकुमार पारस आणि इतर ४ खासदारांना पक्षातून निलंबित केल्याचं जाहीर केलं. पण उलट त्याच्या काही दिवसांतच पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये पशुपतीकुमार पारस यांचीच अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे चिराग पासवान यांना पहिला झटका तिथे बसला.
काही दिवसांनी चिराग पासवान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच या प्रकरणात लक्ष घालण्याचे साकडे घातले. मी आजपर्यंत हनुमानाप्रमाणे पंतप्रधानांना प्रत्येक अडचणीच्या काळात साथ दिली.
आज जेव्हा हनुमानाचा राजकीय वध करण्याचा प्रयत्न होत असताना मला विश्वास आहे की अशा परिस्थितीत राम शांत बसणार नाहीत , असं म्हणत चिराग पासवान यांनी पंतप्रधानांना आवाहन केलं. पण तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. पंतप्रधानांनी पशुपतीकुमार यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात घेत त्यांचं एक प्रकारे समर्थनच केलं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App