वृत्तसंस्था
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला आज सोमवारी अपेक्षित असलेली नार्को टेस्ट रद्द झाली आहे. कारण त्याच्या पॉलिग्राफ टेस्ट साठी कोर्टाची परवानगी आवश्यक आहे. श्रद्धाची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करणारा आफताब पोलिसांनी वेगवेगळी माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर पोलिसांनी नार्को टेस्टची मागणी केली असता दिल्ली न्यायालयाने त्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, सोमवारी ही नार्को टेस्ट होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. Court permission required for Aftab’s polygraph test
…म्हणून होणार नाही नार्को टेस्ट
आफताबची नार्को चाचणी करण्याआधी पाॅलिग्राफ चाचणी करण्याची आवश्यकता आहे. पण न्यायालयाने अद्याप त्यासाठी परवानगी दिलेली नाही. या परवानग्या मिळण्यासाठी 10 दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही परवानगी मिळेपर्यंत आफताबची नार्को टेस्ट करता येणार नाही.
पाॅलिग्राफ चाचणी म्हणजे काय?
पाॅलिग्राफ चाचणीत संबंधित व्यक्ती खरे बोलत आहे की नाही? याची चाचपणी केली जाते. मात्र यामध्ये शारिरीक संकेतांकडे लक्ष दिले जाते. म्हणजेच त्याचा रक्तदाब, ह्रदयाचे ठोके, श्वसनाचा वेग या गोष्टी पाहिल्या जातात. यानंतर त्याच्या माध्यमातून ती व्यक्ती खरे बोलते आहे की खोटे याबाबत मूल्यांकन केले जाते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App