प्रतिनिधी
सुरत : गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला शह देण्यासाठी गुजरातमध्ये काँग्रेसने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. यामध्ये काँग्रेसने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. त्याला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Prime Minister Modi’s perfect reply to congress
सोमवारी गुजरातच्या सुरेंद्रनगर येथील सभेला संबोधित करताना मोदींनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेसचे लोक माझ्यावर नाल्यातील कीड,नीच अशा शब्दांत टीका करतात पण मी शांतपणे हा अपमान गिळतो कारण मला भारताला विकसित करायचे आहे, असे सांगतम पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
KCR On PM Modi : मोदींच्या पराभवासाठी तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली, देशात सत्ता आल्यास मोफत विजेचे आश्वासनही दिले
मी अपमान गिळतो कारण…
मोदींना त्यांची लायकी दाखवून देऊ, असे काँग्रेसवाले म्हणातात. पण ते राजघराण्यातील आहेत, मी मात्र एका सामान्य कुटुंबातून आलो आहे. मला नीच, खालच्या जातीचा,लायकी नसलेला म्हणालात. तसेच मला काँग्रेसच्या लोकांनी मृत्यूचा व्यापारी देखील म्हटले, पण मी अशा अपमानांकडे दुर्लक्ष करतो आणि गुपचूप असे अपमान गिळतो, कारण मला भारताला एक विकसित देश म्हणून नावारुपास आणायचे आहे. मला देशातील 135 करोड जनतेसाठी काम करायचे आहे. त्यामुळे माझी लायकी दाखवण्यापेक्षा जरा विकासकामांवर बोला, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला उत्तर दिले आहे.
राहुल गांधींना टोला
गुजरातमध्ये भाजपच्या सत्तेविरोधी लाट असल्याचे बोलले जात आहे. पण याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंडण केले आहे. गुजरातला पाणी न देणारे आता पदासाठी यात्रा करत आहेत. पद मिळावे म्हणून पदयात्रा करण्याला विरोध नाही, पण गुजरातमधील नर्मदाविरोधकांना आपल्याकडे का ठेवायचे?, अशा शब्दांत मोदींनी राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App