विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भ्रष्टाचाराने लोकशाहीचे हृदय कुरतडले आहे. हा भ्रष्टाचार कदापि खपवून घेऊ नका, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. भ्रष्ट सरकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींवर भ्रष्टाचारविरोधी कायद्यान्वये वेळीच कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.Corruption gnaws at the heart of democracy, never tolerate corruption: Venkaiah Naidu
माजी कॅबिनेट सचिव आणि झारखंडचे माजी राज्यपाल प्रभातकुमार यांनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना व्यंकय्या नायडू म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात दाखल खटल्यांचा वेगाने निपटारा होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रामाणिकपणे कारवाई करणाºया अधिकाऱ्यांना निराश केले जाऊ नये किंवा त्यांना त्रास दिला जाऊ नये.
प्रामाणिक नागरी सेवकांच्या कामगिरीचा गौरव करण्याची आणि त्यांचे योगदान ओळखण्याची गरज असल्याचे सांगून नायडू म्हणाले, हे केवळ तरुण अधिकाऱ्यांना उत्कृष्टतेसाठी प्रोत्साहन देणारे नसून, अशा प्रसिद्धीमुळे इतरांच्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांची पुनरावृत्ती होण्यासही प्रोत्साहन मिळेल.
सामान्य माणसांना सेवा पुरवण्यासाठी आणि विकासाची फळे लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी देशातील नागरी सेवांचे नैतिक पुनरुत्थान व्हावे. या संदर्भात भ्रष्टाचार कदापि खपवून न घेण्याचे आणि प्रशासनाच्या सर्व पातळींवर संपूर्ण पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करावे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App