आनंदाची बातमी! 252 दिवसांनंतर देशात कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण, 311 जणांचा मृत्यू

कोरोनाच्या संसर्गात वरचेवर घट होताना दिसत आहे. व्यापक लसीकरणामुळे आणि कोविड-19 चे घटणारे रुग्ण यामुळे देशातील जनता सुटकेचा नि:श्वास सोडताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 11,903 नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा 252 दिवसांतील सर्वात कमी आहे. Coronavirus latest update covid cases in 24 hours corona total cases in india


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गात वरचेवर घट होताना दिसत आहे. व्यापक लसीकरणामुळे आणि कोविड-19 चे घटणारे रुग्ण यामुळे देशातील जनता सुटकेचा नि:श्वास सोडताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 11,903 नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा 252 दिवसांतील सर्वात कमी आहे.

मात्र, गेल्या 24 तासांत कोविड-19 मुळे 311 जणांचा मृत्यू झाला आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे या काळात 14,159 लोक या प्राणघातक विषाणू संसर्गातून बरेही झाले आहेत. ही आकडेवारीही दिलासा देणारी आहे, कारण सणासुदीच्या काळात कोरोनाचे प्रमाण वाढण्याची भीती प्रशासनाला होती. बाजारपेठांमधील वाढत्या गर्दीमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीतीही निर्माण झाली होती.

सक्रिय रुग्णसंख्या किती?

देशात अजूनही 1,51,209 सक्रिय कोविड-19 रुग्ण आहेत. आतापर्यंत 3,36,97,740 लोक कोरोना विषाणू संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 311 लोकांचा मृत्यू झाल्याने देशातील एकूण मृतांची संख्या 4,59,191 वर पोहोचली आहे. केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 114 कोटी लसीचे डोस दिले आहेत. राज्यांमध्ये अजूनही 14.68 पेक्षा जास्त लसीचे डोस शिल्लक आहेत.

लसीकरणाने पार केला 107 कोटींचा आकडा

कोरोनाच्या घटत्या घटनांमध्ये लसीकरणाचा वाढता दरही दिलासा देणारी बातमी आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, देशात कोविड-19 लसीकरण कव्हरेज 107.29 कोटींवर पोहोचले आहे. गेल्या 24 तासांत 41.16 लाख कोविड डोस देण्यात आले आहेत. यासह, देशातील रिकव्हरी दर 98.22 टक्के झाला आहे. साप्ताहिक सकारात्मकता दराबद्दल बोलायचे तर, तो 1.18 टक्के राहिला, जो गेल्या 40 दिवसांपासून दोन टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे.

Coronavirus latest update covid cases in 24 hours corona total cases in india

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात