Coronavirus Cases In India : कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागल्याचे चित्र आहे. मागच्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1 लाख 96 हजार 427 नवीन रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे 13 एप्रिलनंतर पहिल्यांदाच देशात दोन लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. 13 एप्रिलला देशात 1 लाख 84 हजार रुग्णांची नोंद झाली होती. मागच्या 24 तासांत कोरोनामुळे 3511 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3 लाख 26 हजार 850 लोक बरे होऊन घरेही गेले आहेत. Coronavirus Cases In India today, Less Than 2 lakh patients Found In Just 24 Hours
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागल्याचे चित्र आहे. मागच्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1 लाख 96 हजार 427 नवीन रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे 13 एप्रिलनंतर पहिल्यांदाच देशात दोन लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. 13 एप्रिलला देशात 1 लाख 84 हजार रुग्णांची नोंद झाली होती. मागच्या 24 तासांत कोरोनामुळे 3511 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3 लाख 26 हजार 850 लोक बरे होऊन घरेही गेले आहेत.
एकूण रुग्णसंख्या – 2 कोटी 69 लाख 48 हजार 874 एकूण बरे झालेले – 2 कोटी 40 लाख 54 हजार 861 एकूण मृत्यू – 3 लाख 7 हजार 231 एकूण सक्रिय रुग्णसंख्या – 25 लाख 86 हजार 782 एकूण लसीकरण – 19 कोटी 85 लाख 38 हजार 999 रुपये
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) म्हटले आहे की, काल भारतात 20 लाख 58 हजार 112 नमुन्यांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यानंतर कालपर्यंत देशात एकूण 33 कोटी 25 लाख 94 हजार 176 नमुन्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या 18 दिवसांपासून भारतात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहेत. 18 दिवसांत 3 लाखांहून कमी रुग्णांची नोंद होत आहे. बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. तर सक्रिय रुग्णसंख्याही कमी होत आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या 15 आठवड्यांत नमुन्यांच्या तपासणीत 2.6 पट वाढ झाली आहे, तर गेल्या दोन आठवड्यांपासून साप्ताहिक संसर्गाचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे.
Coronavirus Cases In India today, Less Than 2 lakh patients Found In Just 24 Hours
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App