Coronavirus Cases in India : देशातील कोरोना संसर्गातील नव्या रुग्णांची संख्या घटल्यानंतर गेल्या 24 तासांत पुन्हा किंचित वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2 लाख 8 हजार 921 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 4157 संक्रमितांनी प्राण गमावले आहेत. त्याचवेळी कोरोनामधून 2 लाख 95 हजार 955 जण बरेही झाले आहेत. गत दिवशी 91,191 सक्रिय रुग्ण कमी झाले. यापूर्वी सोमवारी 1,96,427 लाख नवीन रुग्ण आढळले होते. तर 3511 संक्रमितांचा मृत्यू झाला होता. Coronavirus Cases in India Today 26th May New Cases Of Covid 19
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गातील नव्या रुग्णांची संख्या घटल्यानंतर गेल्या 24 तासांत पुन्हा किंचित वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2 लाख 8 हजार 921 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 4157 संक्रमितांनी प्राण गमावले आहेत. त्याचवेळी कोरोनामधून 2 लाख 95 हजार 955 जण बरेही झाले आहेत. गत दिवशी 91,191 सक्रिय रुग्ण कमी झाले. यापूर्वी सोमवारी 1,96,427 लाख नवीन रुग्ण आढळले होते. तर 3511 संक्रमितांचा मृत्यू झाला होता.
एकूण कोरोना रुग्ण – 2 कोटी 71 लाख 57 हजार 795 एकूण बरे झालेले – 2 कोटी 43 लाख 50 हजार 816 एकूण सक्रिय रुग्ण – 24 लाख 95 हजार 591 एकूण मृत्यू – 3 लाख 11 हजार 388 एकूण लसीकरण – 20 कोटी 6 लाख 62 हजार 456
देशात 25 मेपर्यंत 20 कोटी 6 लाख 62 हजार 456 कोरोना लस डोस देण्यात आले आहेत. गत दिवशी 20 लाख 39 हजार लसी देण्यात आल्या. त्याचबरोबर 33 कोटी 48 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गतदिवशी 22.17 लाख कोरोना नमुन्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या, याचा पॉझिटिव्हिटी रेट 9 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण 1.14 टक्के आहे, तर बरे होण्याचा दर 89 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहेत. कोरोना सक्रिय रुग्णांच्या बाबतीत भारत जगात दुसर्या क्रमांकावर आहे. संसर्ग झालेल्या एकूण लोकांच्या बाबतीतही भारत दुसर्या क्रमांकावर आहे. तर अमेरिका आणि ब्राझीलनंतर जगात सर्वाधिक मृत्यू भारतात आहेत.
देशातील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनामधून बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांहून अधिक आहे. यामुळे देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे. देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या 24 लाखांवर आली आहे, जी एका महिन्यात 37 लाखांवर पोहोचली आहे.
सर्वाधिक रुग्ण बरे होणाऱ्या राज्यांबद्दल सांगायचे झाल्यास दिल्ली सर्वात पुढे आहे. येथे बरे होण्याचा दर 97 टक्के आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणा येथे 94 टक्के बरे होण्याचा दर आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात सुमारे 93 टक्के रुग्ण बरे होत आहेत.
Coronavirus Cases in India Today 26th May New Cases Of Covid 19
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App