वृत्तसंस्था
लखनऊ : कोरोना प्रभावित व्यक्तीला महिन्याची पगारी सुटी दिली जाईल, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. त्यामुळे सरकारी; कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. Corona virus: Big decision of Yogi government, 1 month paid leave to Corona positive employee
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारने हा निर्णय घेतला. कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांना १ महिन्यांची पगार रजा आणि कोरोना व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना २१ दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
कंटेनमेंट झोनमधून येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यासही २१ दिवसांची सुटी मिळणार आहे. १ महिन्यांपेक्षा अधिक सु टी हवी असल्यास, नोंदणीकृत एलोपॅथी डॉक्टरकडून प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. कोरोनाशिवाय इतरही गंभीर आजारांसाठी ही सु टी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App