विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – गेल्या चोवीस तासात भारतात ८४८८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून हा आकडा गेल्या ५३८ दिवसांतील नीचांकी पातळीवर आहे. देशात आतापर्यंत ३,४५,१८,९०१ जणांना कोरोनाची लागण झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या आता १ लाख १८ हजार ४४३ वर आली आहे. एकूण मृतांची संख्या ४,६५,९११ इतकी आहे.Corona spread minimized
गेल्या चोवीस तासात १२,५१० जण बरे झाले असून आतापर्यंत ३,३९,३४,५४७ जण बरे झाले आहेत. दररोजचा पॉझिटिव्हीटी रेट १.०८ टक्के असून तो गेल्या ४९ दिवसांपासून दोन टक्क्यांखाली राहत आहे. बरे होण्याचे प्रमाण देखील ९८.३१ टक्के आहे.
साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेटचा विचार केल्यास तो ०.९३ टक्के असून तो गेल्या ५९ दिवसांतील २ टक्क्यांखाली आहे. आतापर्यंत देशातील ११६.८७ कोटी डोस देण्यात आले आहेत. ७ ऑगस्ट २०२० रोजी भारताने २० लाखांचा टप्पा गाठला होता.
त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी ३० लाख तर ५ सप्टेंबरला ४० लाख जणांना कोरोनाची लागण झाली होती. ५० लाखांचा आकडा १६ सप्टेंबरला गाठला होता. १९ डिसेंबर रोजी १ कोटी, चार मे २०२१ रोजी दोन कोटी तर २३ जून रोजी तीन कोटी जणांना लागण झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App