वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्याच्या सोनारपूर नगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे तेथे आजपासून तीन दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. Corona patients on the rise in West Bengal
दुर्गा पूजेनंतर पश्चिम बंगालमध्ये रुग्णसंख्या वाढत आल्याचे दिसून आल्याने ही एकधोक्याची घंटा मानली जात आहे. विशेष सण, उत्सवानंतर आता अचानक देशातील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. सोनारपूर नगरपालिका ही पश्चिम बंगालची राजधानी कोलकातापासून जवळपास २० किलोमीटर दूर आहे. सोनारपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच २८ ऑक्टोबरपासन तीन दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा करताना सोनारपूरच्या सर्व ३५ वॉर्डमध्ये तीन दिवसांदरम्यान फक्त इमर्जन्सी सेवा सुरू असणार आहेत. बाकी सर्व दुकानं बंद असणार आहेत. येथे आतापर्यंत १९ कंटेन्टमेंट झोन आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App