Corona outbreak : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार केला आहे. पुन्हा एकदा मागचे सर्व रेकॉर्ड मोडत दिवसभरात सर्वात जास्त रुग्णसंख्या आढळली आहे. वर्ल्डमीटरच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासांत 3,46,786 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी, या काळात 2624 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. मागच्या सलग आठ दिवसांपासून रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढत आहे. Corona outbreak Latest Updates In India Record break of 3.45 lakh patients in Just 24 hours
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार केला आहे. पुन्हा एकदा मागचे सर्व रेकॉर्ड मोडत दिवसभरात सर्वात जास्त रुग्णसंख्या आढळली आहे. वर्ल्डमीटरच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासांत 3,46,786 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी, या काळात 2624 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. मागच्या सलग आठ दिवसांपासून रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढत आहे.
देशातील महामारीमुळे मरणाऱ्यांची एकूण संख्या वाढून 1,89,544 झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे संसर्गित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1,66,10,481 वर गेली आहे. देशात उपचार घेत असलेल्या म्हणजेच सक्रिय रुग्णांची संख्या 25,52,940 वर आहे. हा आकडा संक्रमित रुग्णांच्या एकूण संख्येच्या 15.3 टक्के आहे. यापूर्वी गुरुवारी रात्री नवीन 3.32 लाख रुग्ण आढळले. याच काळात 2624 जणांचा मृत्यू झालाय. अशाप्रकारे भारताने कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत विश्वविक्रम मोडला आहे. दैनंदिन केसेसच्या बाबतीत भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहे, ही देशासाठी चिंतेची बाब आहे.
India reports 3,46,786 new #COVID19 cases, 2,624 deaths and 2,19,838 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry Total cases: 1,66,10,481Total recoveries: 1,38,67,997Death toll: 1,89,544 Active cases: 25,52,940 Total vaccination: 13,83,79,832 pic.twitter.com/ExbQhoN65D — ANI (@ANI) April 24, 2021
India reports 3,46,786 new #COVID19 cases, 2,624 deaths and 2,19,838 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,66,10,481Total recoveries: 1,38,67,997Death toll: 1,89,544 Active cases: 25,52,940
Total vaccination: 13,83,79,832 pic.twitter.com/ExbQhoN65D
— ANI (@ANI) April 24, 2021
कोरोना संक्रमित रुग्णांचा बरे होण्याचा दर 83.5 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आकडेवारीनुसार, या आजाराने बरे होणार्या लोकांची संख्या वाढून 1,38,67,997 झाली आहे. कोरोनामधील राष्ट्रीय मृतांची संख्या घटून 1.1 टक्के झाली आहे.
24 तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक 773 जणांचा मृत्यू झाला. यानंतर दिल्लीत 348, छत्तीसगडमध्ये 219, उत्तर प्रदेशात 196, गुजरात 142, कर्नाटकात 190, पंजाबमध्ये 75 आणि मध्य प्रदेशात 74 जणांचा मृत्यू झाला. या आठ राज्यांमध्ये एकूण 2017 मृत्यू झाले आहेत, जे एकूण 2620 मृत्यूंपैकी 76.98 टक्के आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक 66,836 नवीन रुग्ण आढळले. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 2844747, दिल्लीमध्ये 24331, कर्नाटकमध्ये 26962, केरळमध्ये 28447, राजस्थानमध्ये 15398 आणि छत्तीसगडमध्ये 17397 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. या सात राज्यांमध्ये एकूण संक्रमणांपैकी 60.24 टक्के वाटा आहे.
Corona outbreak Latest Updates In India Record break of 3.45 lakh patients in Just 24 hours
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App