प्रतिनिधी
नवी दिल्ली : ओमायक्रॉनचा उपप्रकार बीए 2 हा कहर करत आहे. युरोपातील देश, चीनसह इतर अनेक देशांमध्ये बाधित वाढले. सुदैवाने भारतात मात्र हा संसर्ग सातत्याने कमी होत आहे. त्यासाठी राबविण्यात आलेली प्रचंड लसीकरण मोहीम कारण आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढलेली आहे. असा विचार करणे चुकीचे ठरणार नाही. Corona is milder in India than in Europe On active cases 15, 378
देशात गेल्या २४ तासांत १२५९ नवे कोविड रुग्ण आढळले. ३५ जणांचा मृत्यू झाला. या काळात ऑक्टिव्ह केसेस १५,३७८वर आल्या. महामारीतून १७०५ लोक बरे झाले. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत दिलासा मिळाला. सक्रिय रुग्णांमध्ये ४८१ने घट झाली. यादरम्यान १७०५ जण बरे झाले.
कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४,२४,८५,५३४ आहे. तर आणखी ३५ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांचा आकडा ५ लाख २१ हजार ७० वर पोहोचला.
लसीकरण वेगाने सुरू
गेल्या २४ तासांत लसीकरण वेगाने सुरू होते. २५,९२,४०७ लोकांना कोरोनाची लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण १,८३,५३,९०,४९९ डोस देण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग सध्या आशियामध्ये स्थिर आहे. तो चीन आणि युरोपमध्ये वेगाने पसरत आहे. ओमायक्रॉन चे बीए.2 प्रकार या देशांमध्ये संसर्गाचे कारण आहे. या सर्व प्रकारांमुळे तेथील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.
चीनमधली परिस्थिती बिकट होत चालली आहे. शांघायसह अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. चीन दोन वर्षांतील सर्वात मोठ्या कोरोना संकटाचा सामना करत आहे. आता तेथे आढळलेल्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या दिवसांच्या तुलनेत ही संख्या प्रचंड आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App