कंगना रनौतचे वादग्रस्त वक्तव्य, गुन्हा दाखल करण्याची मागणी करत कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून पुण्यात तक्रार दाखल

भारताला १९४७ साली भिक मिळाली होती, खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले असे वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतवर पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस समीर उत्तरकर यांनी यासंदर्भातली तक्रार दिली आहे.Controversial statement of Kangana Ranaut, Congress,NCP filed a complaint in Pune demanding filing of a case


विशेष प्रतिनिधी

पुणे : भारताला १९४७ साली भिक मिळाली होती, खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले असे वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतवर पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस समीर उत्तरकर यांनी यासंदर्भातली तक्रार दिली आहे.
कंगना रनौतने एका कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळेच कंगनाच्या विरोधात ही तक्रार देण्यात आली होती. तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अभिनेत्री कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुंबईतही आपकडूनही तक्रार दाखल करण्यात आली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रक्त सांडले त्या सगळ्यांचा कंगना रनौतने अपमान केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कंगनाने एका कार्यक्रमात असे वक्तव्य केले आहे की, 1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले आहे.
कंगनाच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. तिच्याविरोधात मुंबई आणि पुण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

Controversial statement of Kangana Ranaut, Congress,NCP filed a complaint in Pune demanding filing of a case

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात