उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे वादग्रस्त पोस्टर; राहुल गांधींना ‘भगवान कृष्ण’ दर्शवले

या पोस्टरमध्ये अजय राय यांना ‘अर्जुन’ दर्शवले आहे ; राजकीय वातावरण तापणार.


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आज कानपूरमध्ये पोहोचत आहे. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. या पोस्टरमध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी ‘भगवान कृष्ण’ आणि यूपी काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय ‘अर्जुन’ म्हणून दाखवले आहेत.Controversial Congress poster in Uttar Pradesh Showed Lord Krishna to Rahul Gandhi

राहुल गांधी आणि अजय राय रथावर स्वार असल्याचे पोस्टरमध्ये दिसत आहे. राहुल गांधी यांची थेट भगवान कृष्णाशी तुलना केल्याने हे पोस्टर वादग्रस्त असल्याचे बोलले जात आहे. या पोस्टरमुळे राजकीय खळबळ उडणार हे नक्की.



‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मनम् श्रीजाम्यहम्’ हा श्रीमद भागवत गीतेचा श्लोकही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पोस्टरमध्ये लिहिलेला आहे. या श्लोकाचा हिंदीतील अर्थ असा आहे की, ‘जेव्हा सदाचाराची हानी होते आणि अधर्माची वाढ होते, तेव्हा मी माझ्या रूपात प्रकट होतो’.

काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आज अमेठी, रायबरेली मार्गे कानपूरला पोहोचत आहे. दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी बुधवारी सांगितले की, राहुल गांधी त्यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’मधून काही दिवसांची विश्रांती घेतील आणि या महिन्याच्या अखेरीस ब्रिटनच्या प्रतिष्ठित केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देतील आणि त्यानंतर काही महत्त्वाच्या बैठकांमध्येही सहभागी होतील. रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट केले, “भारत जोडो न्याय यात्रेचा ३९वा दिवस आज कानपूरमध्ये दुपारी २ वाजता संपेल.”

जयराम रमेश यांनी सांगितले की, 22 आणि 23 फेब्रुवारीला यात्रा काही काळासाठी थांबेल त्यानंतर २४ फेब्रुवारीला सकाळी मुरादाबाद येथून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ पुन्हा सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मणिपूरमधून १४ जानेवारीला सुरू झाली. त्याचा समारोप पुढील महिन्यात मुंबईत होणार आहे.

Controversial Congress poster in Uttar Pradesh Showed Lord Krishna to Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात