वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्ली सेवा विधेयका संदर्भात राज्यसभेत मोठे घमासन सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. आम्ही देशावर आणीबाणी लादण्यासाठी किंवा कोणत्या पंतप्रधानाचे पद वाचवण्यासाठी घटनादुरुस्ती करत नाही, असा टोला अमित शाहांनी काँग्रेसला लगावला आहे.constitution to impose emergency or save the prime minister’s office; Amit Shah’s challenge to Congress
दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर होत असताना अमित शाह यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे सरकार वाटेल तेव्हा संविधानात बदल करत आहे. लोकशाही धोक्यात आणत आहे. राज्यांच्या घटनात्मक अधिकारांना हरताळ फासत आहे, असे आरोप काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या सदस्यांनी केले. या आरोपांना अमित शहा यांनी तितकेच प्रखर उत्तर दिले.
अमित शाह म्हणाले, देशात पहिली घटना दुरुस्ती झाली, तेव्हापासून संविधानात बदल होत आहेत. पण काही नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी संविधानात बदल केले. आपले पंतप्रधानपद टिकावे म्हणून देशावर आणीबाणी लादली आणि त्याला घटनादुरुस्तीची जोड दिली. तशी घटना दुरुस्ती आम्ही करत नाही. देशावर आणीबाणी लादण्यासाठी किंवा एखाद्या पंतप्रधानाचे पद वाचवण्यासाठी आम्ही घटनादुरुस्ती करत नाही, असा टोला अमित शहा यांनी काँग्रेसला लगावला.
संविधान सभा में सबसे पहला संविधान संशोधन पारित किया गया था। तब से संविधान को बदलने की प्रक्रिया चल रही है। हम संविधान में बदलाव आपातकाल डालने के लिए नहीं लाए हैं। हम संविधान में बदलाव उस समय की तत्कालीन प्रधानमंत्री की सदस्यता को पुनर्जीवित करने के लिए नहीं लाए हैं: राष्ट्रीय… pic.twitter.com/7OBcTA5cBN — ANI_HindiNews (@AHindinews) August 7, 2023
संविधान सभा में सबसे पहला संविधान संशोधन पारित किया गया था। तब से संविधान को बदलने की प्रक्रिया चल रही है। हम संविधान में बदलाव आपातकाल डालने के लिए नहीं लाए हैं। हम संविधान में बदलाव उस समय की तत्कालीन प्रधानमंत्री की सदस्यता को पुनर्जीवित करने के लिए नहीं लाए हैं: राष्ट्रीय… pic.twitter.com/7OBcTA5cBN
— ANI_HindiNews (@AHindinews) August 7, 2023
इंदिरा गांधींकडून घटनादुरुस्ती
1975 मध्ये इंदिरा गांधींच्या लोकसभा सदस्यत्वासंदर्भात अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींच्या विरोधात निर्णय दिला होता. त्यामुळे त्यांचे पंतप्रधान पद धोक्यात आले होते. त्यावेळी इंदिरा सरकारने घटनादुरुस्ती करून आपले पद वाचवले. त्याचवेळी देशावर आणीबाणी लादली. याचाच संदर्भ घेऊन अमित शाह यांनी आज काँग्रेस सह सर्व विरोधकांना स्पष्ट सुनावले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App