विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोड नंबर देऊन बीडमध्ये जाळपोळ करण्यात आलीये. बीडमध्ये विचारपूर्वक प्लॅनिंग करुन जाळपोळ झालीये, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्यात केला. बीडमध्ये जाळपोळ झाली तेव्हा काही मुस्लिम बांधवांनी लोकांना वाचवलं असल्याचं भुजबळांनी म्हटलं. त्यातील काही लोकांचा सत्कार देखील भुजबळांनी यावेळी व्यासपीठावर केला. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केलाय. Conspiracy to commit arson in Beed; OBC reservation should not be a shock; Chhagan Bhujbal’s warning
गोपिनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्नच निर्माण झाला नसता, असं ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्यात म्हटलं. बीडमध्ये शनिवार 13 जानेवारी रोजी ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला.
एकाच पक्षाला गावबंदी नाही, जरांगेच्या बोर्डाशेजारी रोहित पवारांच्या स्वागताचे बोर्ड; छगन भुजबळांनी ठेवले मर्मावर बोट!!
ओबीसीतून मराठा आरक्षण घेऊ देणार नाही
या सगळ्यांना जाळपोळ करायला कोणी भर घताली, याचा अर्थ हे सगळे तुमचेच गुंड होते, असा आरोप भुजबळांनी त्यांच्या भाषणातून केलाय. जालन्यात 5 हजार रुपयाचा पिस्तूल येत आहेत. हे कशासाठी याचा शोध घ्या, कोण आणतंय, कशासाठी आणतंय, याचा छडा लागला पाहिजे. आमच्या पाठिशी उभं राहायला सांगतायत, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, मी तुमच्या पाठिशी आहे. पण आता हे लोक बोलतायत ओबीसीतूनच मराठा आरक्षण हवं, पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही. सर्वोच्च न्यायालयानं त्यांचं आरक्षण फेटाळलं. आता मला आश्चर्य वाटतंय,वेगवेगळे आयोग उभे राहिलेत. त्यांचं काम एकच, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे.
जरांगेंवर हल्लाबोल
तीन कोटी मराठा समाजाला मुंबईत घेऊन जाणार, असं उपोषणकर्ते सांगतायत. तुम्ही फिर फिरणार आणि हॉस्पिटल मध्ये झोपणार. दोन, चार मिटींगा घेणार. अजित पवार इतकचं म्हणाले की, तुम्ही कायदा पाळा. त्यांच्यावर कीती घाणरेड्या शब्दांत त्यांच्यावर टीका करण्यात आली. एवढी मस्ती कुठून आली तुला, असं म्हणत छगन भुजबळांनी जरांगेंवर हल्लाबोल केला.
संदीप क्षीरसागर, रोहित पवार हे दुसऱ्या दिवशी जरांगेला भेटायला हॉस्पिटलला गेले,ते कशाला गेले असा सवाल देखील भुजबळांनी यानिमित्ताने उपस्थित केलाय. पुढे त्यांनी म्हटलं की, शाब्बास की देतो, सुभाष राऊत दुसऱ्या दिवशी ओबीसीच्य कामासाठी बाहेर पडले, असं भुजबळांनी म्हटलं.
इतिहासात कुठेही म्हटलं नाही, की शिवाजी महाराज मराठ्यांना घेऊन लढले. इतिहासात शिवाजी महाराज मावळे घेऊन लढले,असंच म्हटलंय. आता हेच त्याच छत्रपतींचं नाव घेऊन आम्हाला शिवीगाळ करतायत, आमची लायकी काढतायत, असं म्हणत भुजबळांनी हल्लाबोल केला. अनेक संत या ओबीसी समाजाने महाराष्ट्राला दिले, असं भुजबळांनी म्हटलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App