वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मागच्या काही काळापासून रेल्वेच्या रुळांवर लोखंडी रॉड, बोल्डर, सिलिंडर इत्यादी ठेवून घातपाताचे प्रयत्न उघड झाले आहेत. त्यामागे दहशतवाद्यांचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच सरकारने त्याबाबत कठोर पावले उचलली आहेत. ताज्या घटनांचा तपास पोलिस, गुप्तचर यंत्रणा याव्यतिरिक्त एनआयएही करत आहे. तपासातून मिळालेल्या इनपुटनंतर रेल्वेने सतर्कता वाढवली आहे. गुप्तचर विभागालादेखील इशारा दिला आहे. आता रेल्वे घातपाताचा कट करणाऱ्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल. त्यासाठी रेल्वे अधिनियमांत दुरुस्ती केली जाणार आहे. याविषयीची अधिसूचना लवकरच जाहीर होऊ शकते.
गेल्या दोन महिन्यांत रेल्वेचा घातपात करण्याचे 20 पेक्षा जास्त प्रयत्न समोर आले आहेत. अनेक राज्यांत रुळांवर अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. सद्यस्थितीत रेल्वे अधिनियम-1989च्या कलम 151 अंतर्गत रेल्वे दुर्घटनेचा कट सिद्ध झाल्यास कमाल दहा वर्षांची शिक्षा व दंडाची तरतूद आहे. आता या अधिनियमांत उपकलम जोडून त्यास देशद्रोहाच्या श्रेणीत आणण्याची तयारी केली जात आहे.
गृह खात्याच्या सुत्रानुसार रुळावर अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न हा कट आहे. यातून दुर्घटना घडल्यास प्राणहानी होते. आता आरोपीच्या विरोधात सामुहिक हत्येचे कलमही लावले जाऊ शकते. त्यात जन्मठेपेपासून मृत्यूदंडापर्यंतची तरतूद असू शकते. त्यावरून कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. लवकरच ते जाहीर केले जातील. धरणे-निदर्शन इत्यादीद्वारे रेल्वे प्रवासावर परिणाम झाल्यास नवीन नियम लागू नसतील.
मुंबई-दिल्ली मेन लाइनवर गाडी रुळावरून घसरण्याचा मोठा कट उधळला गेला. अज्ञात लोकांनी सुरतच्या परिसरातील कीम स्टेशनजवळ शनिवारी पहाटे रुळामध्ये लावली जाणारी फिश प्लेट व की काढून ती रुळावर ठेवली. या मार्गावरून गरीब रथ व ऑगस्ट क्रांती राजधानी जाणार होती. परंतु गाडी या भागातून जाण्याच्या आधी गँगमनच्या माहितीवरून अधिकारी व अभियंते घटनास्थळी पाेहोचले. २५ मिनिटांनंतर रुळावरून गाडी धावली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App